Nashik NMC Star Rate Controversy | 'स्टार रेट' वादाला नवे वळण; आयुक्तांचे लेखी निवेदन अन् महाजनांच्या भूमिकेत विसंगती?

Nashik NMC Star Rate Controversy | आयुक्तांचे लेखी निवेदन अन् महाजनांच्या भूमिकेत विसंगती?
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डांबरीकरणाच्या कामांसाठी 'स्टार रेट' लागू करण्याच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने महासभेत दिलेले लेखी स्पष्टीकरण आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत मांडलेली भूमिका यामध्ये विसंगती दिसून येत असल्याने हा वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Girish Mahajan
Nashik Shetkari Karjmukti Yojana eKYC| पात्र 27 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या पहिल्या टप्प्याला वेग

गत १७ जुलै रोजी झालेल्या महासभेत डांबरीकरणाच्या कामांना स्टार रेट मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापूर्वी स्थायी समितीनेही या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र, नगरसेवकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे लक्षात घेऊन आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रशासनाच्या वतीने लेखी निवेदन सादर करत हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. या निवेदनात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसून दर स्थिर असल्यामुळे स्टार रेटचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, शनिवारी (१ ऑगस्ट) झालेल्या कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी इंधनाचे दर अडीच ते तीनपट वाढल्याने संबंधित ठेकेदारांना स्टार रेटनुसार अतिरिक्त दर देणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करत या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.

त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या लेखी निवेदनातील भूमिका आणि मंत्र्यांच्या वक्तव्यातील दावा यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयुक्तांनी इंधनाचे दर स्थिर असल्याचे लेखी नमूद केले असताना मंत्र्यांसमोर वाढलेल्या दरांचा मुद्दा कसा मांडला गेला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Girish Mahajan
Sangli News : दीड कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त

प्रशासनाने वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती मंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष

स्टार रेटच्या निर्णयाबाबत आता अंतिम भूमिका काय घेतली जाते, तसेच या विसंगतीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन काय स्पष्टीकरण देतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, डांबरीकरणाच्या कामांसाठी स्टार रेट लागू करण्याबाबत सत्ताधारी भाजप आग्रही असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news