Financial Fraud Case | नव्वद लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात सुनील कोलियॉट आणि अरुणा श्वाटर्झ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Financial Fraud Case | वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून फसवणुकीची तक्रार
Fraud Case
Fraud Casepudhari
Published on: 
Updated on: 

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
क्लाउड आधारित तंत्रज्ञान व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ९० लाख रुपयांची कथित फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असल्याने न्यायालयात धाव घेतलेले संशयित सुनील कोलियॉट आणि अरुणा श्वाटर्झ या दोघांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

Fraud Case
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

वास्को पोलिसांनी गेल्या ३० एप्रिल २०२६ रोजी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार २०१५ ते २०१९ या कालावधीत खेमिया टेक्नॉलॉजीज प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून क्लाउड आधारित तंत्रज्ञान व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देऊन तक्रारदाराकडून गुंतवणूक करून घेण्यात आल्याचा आरोप आहे.

विश्वास वेअरहाउसिंग अँड ट्रेडिंग प्राइव्हेट लिमिटेड' आणि 'शिकारगाह प्राइव्हेट लिमिटेड' यांनी प्रत्येकी ४५ लाख रुपये गुंतवले होते. मात्र, प्रत्यक्ष व्यवसाय सुरू न करता आर्थिक विवरणामध्ये फेरफार करण्यात आला. गुंतवलेल्या निधीचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Fraud Case
Cyber Fraud Case Goa | नुवे येथील युवकाला 1.85 लाखाला ऑनलाईन गंडा

या प्रकरणी वास्को पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संशयिताच्या वकिलांनी बाजू मांडताना हा मूळता दिवाणी आणि व्यावसायिक स्वरूपाचा वाद असून त्याला गुन्हेगारी स्वरूप देऊन संशयितांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा युक्तिवाद केला. तसेच या प्रकरणातील सहआरोपी चंदू नायर याला पोलिसांनी अटक केलेली नसल्याने अर्जदारांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायल्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर संशयितांना अटक झाल्यास प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर आणि एका जामीनदाराच्या हमीवर सोडण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी पाच दिवस आधी लेखी नोटीस दिल्यास संशयितांनी वास्को पोलिस ठाण्यात हजर राहून तपासात सहकार्य करावे, अशी अटही घातली आहे. याशिवाय, न्यायालयाच्या परवानगीशिवाय एका दिवसात बँक खात्यातून २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास किंवा हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news