नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांवर तोडगा निघणार

नाशिक- मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा वाद थेट विधिमंडळात
Nashik
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत माजी महापौर दशरथ पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती.file photo

नाशिक : नाशिक- मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा वाद थेट विधिमंडळात पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सोमवारी (दि.८) मंत्रालयात बैठक बोलविली आहे. मंत्री छगन भुजबळ, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. ॲड. राहुल ढिकले यांनी यासंदर्भात शासन पातळीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर महामार्गावरील खड्ड्यांवर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Nashik
नाशिकच्या खड्ड्यांचा विषय आज उच्च न्यायालयात

पावसामुळे नाशिक- मुंबई महामार्गाची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नाशिक-मुंबई या तीन तासांच्या प्रवासासाठी आता आठ ते दहा तासांचा वेळ खर्ची पडत आहेत. छगन भुजबळ यांनी या महामार्गावरील खड्ड्यांबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला होता. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यानंतर आ. फरांदे, आ. हिरे, आ. ढिकले यांनी विधीमंडळात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. नाशिक- मुंबई महामार्गाचा भिवंडी बायपास पर्यंतचा रस्ता तीन यंत्रणांकडे विभागून आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सदर रस्त्याचा काही भाग असून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे काही भाग आहे तर काही भाग राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याची वास्तविकता नमूद करताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासाठी कोणाला जाब विचारायचा? असा प्रश्न करत सदर रस्त्याचे संपूर्ण काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करऱ्याची मागणी आ. फरांदे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत सोमवारी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत महामार्गावरील खड्ड्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आ. फरांदे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news