

नाशिक : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेचा अधिकृत कत्तलखाना बंद ठेवला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रकावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून, बुधवारी (दि.13) रोजी जारी केले जाणार आहे.
शहरात सुमारे एक हजार मांस, मासळी विक्रीची दुकाने आहेत. स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी होत आहे. किंबहुना राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेने 1988 च्या शासन नियमाचा आधार घेऊन केवळ कत्तलखानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरांमधील कत्तलखान्याबरोबर मासविक्री बंद करण्याचा निर्णय झाला, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शरद पवार यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस यासारखे पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने मंगळवारी सायंकाळी आयुक्त मनीषा खत्री यांची कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतच्या परिपत्रकावर सही घेतली. मात्र, ते बुधवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन नियमानुसार नोटिफाइड असलेले कत्तलखाने बंद राहणार असून, या संदर्भातील अधिसूचनेवर आयुक्तांची सही झाली असून, बुधवारी प्रसिद्ध केले जातील.
डॉ. प्रमोद सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी