सांगली, मिरजेतील दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद करा; मंत्री नितेश राणे यांची सूचना

मिरज, कुपवाडमध्येही फिश मार्केट उभारू
MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणेFile Photo
Published on
Updated on

सांगली : राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू आहे. महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरजेतील दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजेत, अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्तांना केली. मिरज व कुपवाडमध्येही फिश मार्केट उभारू, प्रस्ताव द्या, तातडीने मंजूर करू, अशी घोषणाही त्यांनी केली. येथील बदाम चौकात महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणार्‍या मच्छी व मटण मार्केटच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

खासदार विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजपचे नेते सम्राट महाडिक, माजी नगरसेविका अ‍ॅड. स्वाती शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, माजी नगरसेवक मयूर पाटील, भाजपचे युवा नेते सुजित राऊत, तौफिक पठाण, माजी सभापती निरंजन आवटी, शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे उपस्थित होते.

राणे म्हणाले, सांगलीत फिश मार्केटसाठी माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी प्रयत्न केले. अद्ययावत असे हे मार्केट वेळेत, चांगल्या पद्धतीचे दर्जेदार होण्यासाठी आयुक्तांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. ठेकेदाराची शाळा चालवू देऊ नये. सांगलीचे फिश मार्केट अद्ययावत असेल. फिश मार्केट झाल्यानंतर रस्त्यावर विक्री होणार नाही, याची दक्षता महापालिका आयुक्तांनी घ्यावी. नागरिकांनीही रस्त्यावर खरेदी न करता फिश मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावी.

सांगलीत आणखी एक मजला..!

सांगलीत अद्ययावत फिश मार्केट उभारू. फिश मार्केटला कोल्डस्टोअरेज सुविधेची गरज आहे. त्यामुळे आणखी एक मजला उभारणी व त्यामध्ये कोल्डस्टोअरेज सुविधेसाठी तातडीने प्रस्ताव द्या, तोही मंजूर करू, असे आश्वासन राणे यांनी दिले. नीतेश राणे म्हणाले, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे तरुण अधिकारी आहेत. त्यांना विकासकामांविषयी आस्था आहे. त्यांचा लोकप्रतिनिधींशी चांगला समन्वय आहे. विविध कामांच्या अनुषंगाने त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. महापालिकेचे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर केले जातील.

आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केटसाठी शासनाने निधी दिला आहे. यातून 81 गाळे उभारण्यात येणार आहेत. प्रशस्त अशी जागा देखील आहे. पण एक मजला जर वाढवून मिळाला तर तिथे कोल्डस्टोअरेज सुविधा उपलब्ध करता येईल.अ‍ॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, सांगलीत जुन्या मार्केटच्या जागी नवीन फिश मार्केट व्हावे, यासाठी 20 वर्षे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमही आधुनिक पद्धतीने होईल. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी आभार मानले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी, व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.

हिंदू-मुस्लिम खेळीमेळीने; मी अपक्ष खासदार

खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीत सर्वधर्मसमभाव असे वातावरण आहे. जुन्या फिश मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू भोई आणि मुस्लिम बांधव खेळीमेळीने राहून व्यवसाय करत आहेत. या नवीन फिश मार्केटसाठी निधी मिळाला आहे. निधी कमी पडला तरी आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. मी अपक्ष खासदार आहे. निधी मिळवण्यासाठी मी कुठेही यायला तयार आहेे. फिश मार्केट चांगले झाले पाहिजे. व्यापारी, ग्राहकांची चांगली सोय झाली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news