Nashik Crime Case | व्याजाच्या पैशांसाठी सतत धमक्या; मानसिक त्रासाला कंटाळून कैलास शिंदे यांचे टोकाचे पाऊल

Nashik Crime Case | याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संदीप पाटील आणि सुलोचना पाटील (रा. नवापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही व्याजाच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावत दाम्पत्याने धमकावल्याने मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संदीप पाटील आणि सुलोचना पाटील (रा. नवापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Death
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्यात 12 कोटी भाविक येणार! अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

याप्रकरणी योगिता शिंदे (२९, रा. नोबेल हॉस्पिटलजवळ, नवापूर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे पती कैलास शिंदे यांनी संदीप पाटील आणि सुलोचना पाटील यांच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेची व्याजासह तीन लाख रुपये परतफेड केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही काही व्याजाची रक्कम बाकी असल्याचे सांगून संशयित आरोपींकडून पैशांची मागणी केली जात होती.

कैलास शिंदे हे उर्वरित व्याजाची रक्कम काही वेळा रोख स्वरूपात, तर काही वेळा भिशीच्या माध्यमातून सुलोचना पाटील यांना नियमितपणे देत होते. पैसे देण्यास उशीर झाल्यास संदीप पाटील हे नवापूर गावातील रस्त्यावर गाठून शिवीगाळ व दमदाटी करीत होते. या त्रासाला कंटाळून शिंदे कुटुंबीयांनी नवापूर सोडून नाशिकमधील अष्टगंध सोसायटी बी, जुनेनगर, म्हसरूळ परिसरात वास्तव्य केले होते.

Death
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्यात 12 कोटी भाविक येणार! अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

मात्र, नाशिकमध्ये आल्यानंतरही संशयितांकडून फोन करून व्याजाची रक्कम न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली जात होती. सततच्या पैशांच्या मागणीमुळे आणि धमक्यांमुळे कैलास शिंदे तणावाखाली होते. नवापूर येथील वास्तव्य सोडून नाशिकमध्ये स्थलांतर केल्यानंतरही त्यांचा त्रास थांबला नाही.

अखेर या सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २५) म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक धीरज गवारे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.