Minor Girl Missing | सकल हिंदू समाजाचा सिन्नरमध्ये रास्ता रोको

Minor Girl Missing | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार
Minor Girl Missing | सकल हिंदू समाजाचा सिन्नरमध्ये रास्ता रोको
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर शहरातील भराडवाडी येथील १७वर्षीय अल्पवयीन मुलीला एका मुस्लीम युवकाने फूस लावून पळवून नेल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास रास्ता रोको केल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

Minor Girl Missing | सकल हिंदू समाजाचा सिन्नरमध्ये रास्ता रोको
Nashik Kumbh Mela 2026 | नाशिककरांना खड्ड्यांतून मिळणार कायमची मुक्ती! 1400 कोटींच्या रस्ते विकासाचा 'प्लॅन' जाहीर

सदर मुलगी गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता असून, तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने समाजात संतापाची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकल हिंद समाजाने आंदोलन पुकारले. आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी लव्ह जिहादविरोधात तीव्र भूमिका घेत राज्यात कठोर कायदा करण्याची मागणी केली.

सकल हिंदू समाजाचे सागर बेग, हर्ष ठाकूर, किन्नर आखाड्याच्या शुभांगी शिंदे, जयराम गिते, गजानन आव्हाड, भाजपचे नेते जयंत आव्हाड, भाजप सिन्नर तालुका प्रभारी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, शहराध्यक्ष सजन सांगळे, पश्चिम मंडल अध्यक्ष समाधान केकाण, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या कीर्ती अंकार, प्रियांका द्विवेदी, सुमन जोशी, सविता कोठुरकर, निखिल लहामगे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Minor Girl Missing | सकल हिंदू समाजाचा सिन्नरमध्ये रास्ता रोको
Nashik Ring Road Project | 50 टक्के भूसंपादन होताच रिंग रोडसाठी निविदा

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित करा, अपहरण केलेल्या तरुणीचा तातडीने शोध घ्या व गुन्हेगारास कडक शिक्षा द्या, अशा घोषणा दिल्या. आंदोलनानंतर तहसीलदार सुरेंद्र देशमुख व सिन्नर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात राज्यात लव्ह जिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तराखंड राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी रास्ता रोको

आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी तातडीने एसटी बस व इतर वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news