Pandhurli Gram Panchayat Scam | पांढुर्ली ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमिता; खरेदी केलेले साहित्य गायब असल्याचे चौकशीत उघड

Pandhurli Gram Panchayat Scam | 350 कचराकुंड्या गोणीतच पडून; ग्रीन जिम मंजूर ठिकाणापासून दूर
scam |
scamFile Photo
Published on
Updated on

सिन्नर : संदीप भोर

पांढुर्ली ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमिततेच्या तक्रारी वाढल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून चौकशी करण्यात आली. त्यात एकेक धक्कादायक बाब पुढे येत गेली. ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर वाडगे यांच्या कारभाराचा 'पंचनामा' करताना आणखी एक धक्कादायक बाब उजेडात आली. ती म्हणजे ग्रामपंचायतीने खरेदी केलेले काही साहित्य कार्यालयात उपलब्ध नसल्याचे आढळले.

scam |
Kolhapur News | जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेच्या आदेशाला ग्रामपंचायतींचा हरताळ

त्यामध्ये २९ ऑगस्ट २०२५ रोजी खरेदी केलेला डेस्कटॉप संगणक, सुमारे ८५ हजार रुपये किमतीचा टीव्ही संच हे दोन्ही साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मिळून आले नसल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

४ एप्रिल २०२४ रोजी खरेदी करण्यात आलेल्या ३५० कचराकुंड्या नागरिकांना वितरित करण्याऐवजी गोदामात गोण्यांमध्ये पडून असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. शासकीय निधीतून खरेदी करूनही त्या वापरात न आणल्यामुळे निधीचा उद्देश साध्य झाला नसल्याचे निरीक्षण चौकशी समितीने नोंदविले आहे.

ग्रामपंचायत नोंदीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ग्रीन जिम उभारण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत त्या ठिकाणी ग्रीन जिम नव्हती. ती नंतर मळ्यातील अंगणवाडीसमोर बसविल्याचे आढळले. चौकशी सुरू झाल्यानंतर अंगणवाडीसाठी टीव्ही आणि आर. ओ. फिल्टर घाईघाईने उपलब्ध करून देण्यात आल्याचेही समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

ग्रामसभा इतिवृत्तात गंभीर त्रुटी

२६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेचे तसेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेचे इतिवृत्त नियमानुसार सात दिवसांत बंद करणे आवश्यक होते. मात्र, दोन्ही ग्रामसभांच्या नोंदवहीत दोन पाने कोरी ठेवून इतिवृत्त अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आल्याचे चौकशीत आढळले. समितीच्या मते, अशा प्रकारे नोंदवही उघडी ठेवणे म्हणजे भविष्यात फेरफार करण्याची शक्यता निर्माण करणारी गंभीर बाब आहे.

scam |
Satana Rural Hospital Biometric Scam | एनसीडी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर प्रश्नचिन्ह

वरिष्ठांच्या आदेशांचे पालनही नाही

चौकशीदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर वाडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, विहित मुदतीत समाधानकारक खुलासा सादर करण्यात आला नाही, असे अहवालात नमूद आहे. तसेच विस्तार अधिकाऱ्यांनी लेखी सूचना देऊनही तक्रारदारांना कायदेशीर नक्कल शुल्क स्वीकारून आवश्यक दप्तर उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. समितीच्या मते, यामुळे पंचायत समिती कार्यालयालाही ग्रामस्थांच्या नाराजीचा सामना करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news