Water Connection | पाच दिवसांत 32 नळकनेक्शन कट

Water Connection | २०७ जोडण्या नियमित, नगर परिषदेकडून १२.०१ लाखांची वसुली
Water Connection | पाच दिवसांत 32 नळकनेक्शन कट
Water Connection | पाच दिवसांत 32 नळकनेक्शन कटpudhari photo
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्यांविरोधात नगर परिषदेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या पाच दिवसांत ३२ अनधिकृत नळ कनेक्शन थेट तोडण्यात आले आहेत. तसेच २०७अनधिकृत नळजोडण्या शुल्क भरून नियमित करण्यात आल्या असून, या मोहिमेतून नगर परिषदेकडे तब्बल १२ लाख १ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

Water Connection | पाच दिवसांत 32 नळकनेक्शन कट
Nanded News : वारंवार खंडित वीजपुरवठ्यावर नगराध्यक्षांचा संताप

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर वाढता ताण आणि अनधिकृत जोडण्यांमुळे होणारे पाणीचोरीचे प्रकार रोखण्यासाठी नगर परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे आणि मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून शहरभर तपासणी सुरू करण्यात आली आहे.

अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करून घेण्यासाठी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागांमध्ये रिक्षाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत २९७ अर्जाचे वितरण करण्यात आले. आवाहनानंतरही अनेक नागरिकांनी आपली नळजोडणी नियमित केली नसल्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग अवलंबिला. पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम यांच्या उपस्थितीत पथके दररोज शहरातील विविध भागांत जाऊन घरभेटी घेत आहेत.

Water Connection | पाच दिवसांत 32 नळकनेक्शन कट
Nevasa Water Problem: नेवासा शहरात तीव्र पाणीटंचाई; जुनी योजना आणि बेकायदेशीर जोडण्या कारणीभूत

तपासणीवेळी अनेक नागरिकांकडून 'घरमालक घरी नाहीत', 'बांधकाम व्यावसायिकांकडे कागदपत्रे आहेत' किंवा 'बिल सध्या उपलब्ध नाही' अशी कारणे सांगितली जात आहेत. अशा नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन ते चार दिवसांची मुदत दिली जात आहे. या पथकात दिनेश लोणारे, दीपक भवर, रोहित बेंडकुळे, आकाश मिठे, रूपेश मिठे, हेमंत जाधव, फकिरा उगले, संजय बालवे, साजीद शेख, राज घेगाडमल, विशाल गवळी, प्लंबर अक्षय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण तसेच छायाचित्रकार दत्ता जोशी आदींचा समावेश पथकात आहे. कारवाई सुरूच राहणार : मुख्याधिकारी कदम अनधिकृत नळजोडण्या शोधून त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपली कनेक्शने अधिकृत करून घ्यावीत अन्यथा नियमांनुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news