Sinnar Cyclists Pandharpur Wari | "सिन्नर सायकलिस्टची पंढरपूर सायकलवारी भक्तिमय वातावरणात संपन्न!; 350 किमीचा टप्पा पार"

Sinnar Cyclists Pandharpur Wari | सिन्नर सायकलिस्टची पंढरपूर सायकलवारी भक्तिमय वातावरणात
Sinnar Cyclists Pandharpur Wari
Sinnar Cyclists Pandharpur Wari
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर सायकलिस्ट परिवारातर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या तीन दिवसांच्या वारीमध्ये सहभागी सायकल वारकऱ्यांनी सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला.

Sinnar Cyclists Pandharpur Wari
Goa Water Metro | "गोव्यात धावणार 'वॉटर मेट्रो'! सविस्तर अहवालासाठी कोची मेट्रोला 5.88 कोटींचा निधी मंजूर"

वारीदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या पारंपारिक दिंड्यांमध्ये सहभागी होत सायकल वारकरी ताळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात नाचत-गात, आनंदोत्सव साजरा करत पुढे सरकत होते. या आगळ्यावेगळ्या सायकलवारीने पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम घडवून आणला.

या वारीमध्ये सर्व वयोगटातील १६६ सायकल वारकरी सहभागी झाले. त्यामध्ये महिला व पुरुष वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Sinnar Cyclists Pandharpur Wari
Goa Tribal Vision 2037: "'गोवा ट्रायबल व्हिजन 2037' हा विकासाचा नवा मार्गदर्शक आराखडा!; मंत्री रमेश तवडकर यांचा पुढाकार"

वारीच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन समिती सूरज देशमुख, डॉ. ज्योती मोरे, गजानन जगताप, संदीप चतुर, चंद्रशेखर..., संतोष कदम आणि विनायक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मार्गदर्शन समिती..., संदीप मोरे, रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाण, नितीन जाधव आणि योगेश शिंदे, सुभाष कुं... यांनी संपूर्ण वारीदरम्यान मार्गदर्शन करून वारी यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

महिला वारकऱ्यांचा सहभाग

पंढरपूर सायकलवारीमध्ये चित्रा जाधव, डॉ. ज्योती मोरे, धनश्री शिंदे, लता चव्हाणके, वंदना सोनवणे, डॉ. अश्विनी आरोटे, रूपाली नाईकवाडी, सारिका गाडे, लता कोठुरकर, सविता काळे, कल्पना गुंजाळ, अर्चना बोराडे, मंजू गुजराथी, डॉ. स्वप्नाली उगले, डॉ. योगिता कांडेकर, सोनल भाटजिरे, स्मिता कदम, वैशाली कवाड, डॉ. स्मिता कवाड, संगीता कवाड आदी महिला वारकरी सहभागी झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news