Sinnar Water Supply | ऐन सणासुदीच्या काळात सिन्नर शहरात सहा ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा

Sinnar Water Supply | योजनांच्या चौकशीसाठी भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
Water Supply
Water Supply file photo
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
ऐन सणासुदीच्या काळात सिन्नरकरांना सहा-सात दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. सख्वाशे कोटी रुपयांची योजना असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने योजनेची सविस्तर चौकशी करून त्रुटी दूर कराव्यात आणि नागरिकांना दररोज पाणी मिळाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी भाजपाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Water Supply
Sinnar Kharif Crop Damage | सिन्नर तालुक्यात खरिपाचे 62 हजार हेक्टरवरील पीक धोक्यात; पावसाची दांडी अन् 'ऑक्टोबर हीट'चा फटका

भाजपा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली गटनेते अनिल सरवार, जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष सजन सांगळे, दौलत केकाणे, वेदांत काळे, रामचंद्र रोडे, विनोद शितोळे, प्रभात डावरे, मीरा साकप आदींनी निवेदन दिले.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळातही ही योजना महिनाभर ठप्प झाली होती.

यंदाही तीच परिस्थिती असून, कडवा पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. धरणात पाणी असूनही ते नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने योजनेचा मूळ उद्देश सफल होत नसल्याची टीका भाजपाने केली. महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि नगर परिषद यांनी समन्वयने काम करून योजनेतील अडथळे दूर करावेत. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उदय सांगळे यांनी केली.

खासदार-आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह:


कडवा पाणीपुरवठा योजना आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यकाळात झाली. विरोधात असताना कोकाटे यांनी योजनेच्या हाइड्रोलिक टेस्टींगसह विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

आता शहराला नियमित पाणी मिळत नसतानाही दोन्ही गप्प असल्याबद्दल भाजपाने आश्चर्य व्यक्त केले. आमदार कोकाटे यांनी २४ तास पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती; मात्र, प्रत्यक्ष सात-सात दिवस पाणी मिळत नसल्याची टीका पक्षाने केली.

Water Supply
Sinnar Kharif Crop Damage | सिन्नर तालुक्यात खरिपाचे 62 हजार हेक्टरवरील पीक धोक्यात; पावसाची दांडी अन् 'ऑक्टोबर हीट'चा फटका

नियोजनाऐवजी निवेदन, भाजपाची टीका:

शिवसेना ठाकरे गट नगर परिषदेत सत्तेत असताना तसेच पाणीपुरवठा सभापतिपद वाजे गटाकडे असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याची वेळ येणे हास्यास्पद असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

वाजे आणि कोकाटे गटाकडे सत्तेची सूत्रे असतानाही नागरिकांना पाण्यासाठी सहा-सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, याचा त्रास मात्र सिन्नरकरांना सहन करावा लागत असल्याचा टीका भाजपाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news