Simhastha Kumbh Mela Website | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात होणार स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण

Simhastha Kumbh Mela Website | 'कुंभदूता'सह एकात्मिक डिजिटल यंत्रणा उभारण्याचे नियोजन
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात येत असून, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासह संकेतस्थळाच्या प्राथमिक आवृत्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डिजिटल सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

Simhastha Kumbh Mela Nashik
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

सिंहस्थ कुंभमेळा संकेतस्थळावर कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्वाणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा आणि भाविकांसाठी आवश्यक सूचनांचा त्यात समावेश राहणार आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर पुढील टप्प्यात वाहनतळ, वाहतुकीतील बदल, प्रवेश व निर्गमन मार्ग, शटल सेवा, पायी जाण्याचे मार्ग आणि सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय यांची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, नकाशाच्या माध्यमातून विविध सुविधांची ठिकाणे शोधता येतील, अशी व्यवस्थाही विकसित करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा सहज शोधता यावेत, यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र निर्देशिका तयार करण्यात येणार आहे. त्यात स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्नान सुविधा, वैद्यकीय मदत केंद्र, रुग्णालये, पोलिस चौक्या, मदत कक्ष, हरवले - सापडले केंद्र, निवासव्यवस्था, अन्नसेवा आणि वाहनतळांची माहिती असेल.

बस व रेल्वेस्थानकांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देणारा स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहे. सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना, गर्दी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आणि प्रतिबंधित वस्तूंची माहितीही त्यात समाविष्ट असणार आहे.

बहुभाषिक सुविधांचा पर्याय

  • देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संकेतस्थळ बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे.

  • मोबाइल, संगणकावर सहज वापरता येण्याबरोबरच कमी इंटरनेट वेगातही संकेतस्थळ कार्यक्षम राहावा, यावर भर दिला जाणार आहे.

  • दिव्यांगांनाही माहिती मिळवण्यासाठी आवश्यक सुलभता सुविधांचा विचार करण्यात आला आहे.

  • निवडक घाट व मंदिरांची आभासी सफर, ३६० अंश दृश्य, ध्वनिमार्गदर्शन, व्हिडिओ आणि अधिकृत थेट प्रक्षेपणाचा लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

'कुंभदूता' द्वारे डिजिटल मदत

  • कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यापक डिजिटल व्यवस्थेत अधिकृत संकेतस्थळासोबत मोबाइल एप्लिकेशनस् आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाविक सहाय्य प्रणाली 'कुंभदूत' यांचाही समावेश प्रस्तावित आहे.

  • विविध डिजिटल माध्यमातून भाविकांना एकसमान आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news