

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक – सिंहस्थात रामकुंड, कुशावर्तावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या गर्दीची माहिती मिळण्याकरिता ड्रोन कॅमेरे लावणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबक येथील गर्दी नियोजनाकरिता प्रशासन ड्रोन कॅमेरे लावण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बैठकीतून प्राप्त झाली आहे
नाशिक जिल्हाधिकारी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शैव व वैष्णव आखाड्याचे महंत उपस्थिती आहे. त्र्यंबकेश्वरला शैव महंतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे तर नाशिक येथील बैठकीत वैष्णव महंत उपस्थित राहतील. कुंभमेळ्याच्या बैठकीत ड्रोन कॅमेरे लावणं आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी मांडले होते. सीसीटीव्ही कॅमेरेसाठी नवीन निविदा काढण्याचे देखील सूचित करण्यात आले आहे.