Simhastha Kumbh Mela : नाशिकच्या ६६ किमी रिंग रोडला मंत्रिमंडळाची मंजुरी

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत होणार काम
Nashik Kumbh Mela
नाशिकच्या ६६ किमी रिंग रोडला मंत्रिमंडळाची मंजुरी file photo
Published on
Updated on

Simhastha Kumbh Mela: Cabinet approves 66 km ring road of Nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ६६ किलोमीटर लांबीचा रिंग रोड आता सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत साकारला जाणार आहे. सिंहस्थासाठी या आंतर रिंग रोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखालील यांच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. या रिंग रोडसाठीच्या आवश्यक भूसंपादनासदेखील मान्यता देण्यात आली असून, नाशिक सिंहस्थ प्राधिकरणामार्फत रिंग रोडसाठीचा निधी खर्च केला जाणार आहे. या रिंग रोडमुळे नाशिक सिंहस्थाकरिता सात मार्गान येणाऱ्या भाविकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Nashik Kumbh Mela
Nashik News : नाशिक तालुक्यात राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात 'मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती'ची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थापूर्वी करावयाच्या रिंग रोडचा प्रस्ताव महापालिकेने एमएसआरडीसीला (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर एमएसआरडीसीने या रिंग रोडच्या कामाला चाल देत पुणेस्थित मोनार्च या सल्लागार संस्थेची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली आहे.

Nashik Kumbh Mela
Leopard News : बिबट्यासाठी ३५ पिंजरे, महिनाभरात तेरा जेरबंद, वनविभागावर धावपळीची वेळ

संबंधित संस्थेने शहरांतर्गत पाथर्डी ते आडगावदरम्यानचा ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंग रोड तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट या दरम्यान ३६ मीटर लांबीचा बाह्य रिंग रोड आणि एनएमआरडीए (नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) क्षेत्रातील रिंग रोडचे सर्वेक्षण पूर्ण अहवाल एमएसआरडीसीला सादरही केला होता. परंतु, खर्चामुळे शासन दरबारी गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडून होता. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोडला चालना दिली आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधा समितीनेही रिंग रोडला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भूसंपादनालाही मान्यता

रिंग रोडची कामे मार्च-जून २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या रस्त्यांकरिता लागणाऱ्या आवश्यक भूसंपादनासाठी मान्यता देण्यात आली असून, यासाठी लागणारा खर्च नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत केला जाणार आहे. हा ६६ किमीचा आंतर रिंग रोड महापालिका आणि एनएमआरडीएच्या हद्दीत असणार आहे. या रिंग रोडमुळे नाशिक कुंभमेळ्याकरिता शहरात सात मार्गाने येणाऱ्या भाविकांना शहरात सहज प्रवेश करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news