Girish Mahajan Nashik | सिंहस्थामुळे नाशिकच्या आध्यात्मिक वैभवाला जागतिक अधिष्ठान

Girish Mahajan Nashik | कुंभमेळा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक, मंगलमय आणि अभिमानाचा दिवस होता. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पवित्र रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर एकाच शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण झाले. या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याचा विधिवत शुभारंभ झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती महोदयांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आभार मानले.

Girish Mahajan
Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

नाशिक ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तर त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्य पवित्र तीर्थक्षेत्र. गोदावरी मातेचा उगम, रामायणाचा वारसा आणि संत-महंतांच्या तपश्चर्येने पवित्र झालेली ही भूमी भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे अद्वितीय प्रतीक आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक सोहळा नसून भारताच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा, एकात्मतेचा आणि सनातन परंपरेचा वैश्विक उत्सव आहे.

या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील सहकरी, सर्व लोकप्रतिनिधी, १३ आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी गोदातीरावर झालेली गोदाआरती हा आणखी एक अविस्मरणीय क्षण ठरला.

Girish Mahajan
Nashik Simhastha Kumbh Mela | ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज; गोदातीर, मंदिरे आणि ऐतिहासिक होळकर पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई

सुमारे साडेसहा हजार आदिवासी बांधवांनी एकत्र येत सादर केलेली गोदा आरती ही आपल्या सांस्कृतिक एकात्मतेची आणि सर्वसमावेशकतेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. या आरतीची गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झालेली नोंद ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळा जागतिक स्तरावर एक आदर्श धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने या कुंभमेळ्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विभागांत समन्वय साधून पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूकव्यवस्था, घाटांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, भाविकांसाठी निवास आणि सुरक्षाव्यवस्थांची कामे करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.