Nashik Election 2026 | नाशिक विधान परिषदेवर शिवसेनाच दावा करणार! खासदार श्रीकांत शिंदेंनी जागावाटपाचा फॉर्म्युला केला स्पष्ट

Nashik Election 2026 | यापूर्वी ज्या जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. त्या जागांवर शिवसेना पुन्हा दावा करणार आहे.
Shrikant Shinde MP
Shrikant Shinde MPPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यापूर्वी ज्या जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. त्या जागांवर शिवसेना पुन्हा दावा करणार आहे. नाशिक विधान परिषदेच्या जागेवरसुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून आलेले होते. त्यामुळे ही जागादेखील शिवसेनेचीच असेल, असे स्पष्ट मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. त्यामुळे नाशिक विधान परिषदेत पुन्हा दराडे पॅटर्न चालणार काय ? अशी चर्चा आता रंगत आहे.

Shrikant Shinde MP
Mumbai Naka MD drugs case - मुंबई नाका परिसरामध्ये एमडी ड्रग्जविरोधात कारवाई, तिघांना अटक, ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शिवसेनेने त्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना नेते खा. डॉ. शिंदे यांनी त्यांच्या शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत सोमवारी (दि. १८) देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच विधान परिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिल्याने, आतापर्यंत या निवडणुका रखडल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाच्या १७ विधान परिषद सदस्यांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून, महायुती म्हणून यापूर्वी ज्या पक्षांनी जागा लढविल्या, त्या सर्व जागा संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनाच लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Shrikant Shinde MP
Nashik Officer transfer inquiry - जिल्हा समुदाय अधिकारी बदली प्रक्रियेची चौकशी

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष नाशिक विधान परिषदेच्या २०१८ च्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे असा सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने, शिवाजी सहाणे यांचे पारडे जड होते. मात्र, या निवडणुकीत दराडे २०० मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी दराडे यांनी, मला छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, यावेळी देखील दराडे पॅटर्नची चर्चा आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

सव्वा लाख बीएलओंची नेमणूक

शिवसेनेकडून पक्षसंघटन मजबूत करण्यात येत असून, राज्यभरात सुमारे सव्वा लाख बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघाची गट, गण आणि बूथनिहाय चर्चा करण्यात आली. २२ जिल्ह्यांतील १०० विधानसभा मतदारसंघांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news