Shravan Somwar 2024: यंदा श्रावणात आला ७१ वर्षांनी दुर्मीळ योग

Nashik: सोमवारपासून प्रारंभ; शहरातील शिवमंदिरांवर होतेय आकर्षक सजावट
Shravan Somwar 2024: यंदा श्रावणात आला ७१ वर्षांनी दुर्मीळ योग
Published on
Updated on

नाशिक : यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यास सोमवारपासून (दि.५) प्रारंभ होत असून, श्रावणाच्या शेवटच्या दिवशी ही सोमवार येत आहे. सन १९५३ असा योग जूळून आला होता. त्यानंतर ७१ वर्षांनी हा योग जुळून आला आहे. शिवभक्तांमध्ये उत्साह आहे. श्रावणनिमित्ताने शहरातील शिवमंदिरांंमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (This rare yog has coincided after 71 years of Shravan Somwar in the year 2024)

सनातन हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. देवाधिदेव श्री महादेव यांच्या आराधनेचा महिना म्हणून श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कालावधीत केलेले जप, तप, आराधना फलदायी ठरते. त्यामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासह अन्य दैवतांचे पूजन या महिन्यात केले. यंदा सोमवारने श्रावणाला प्रारंभ होत असून, विशेष म्हणजे १८ वर्षांनंतर पाच सोमवार आले आहेत.

पुरातन श्री कपालेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या व्यतिरिक्त गंगापूर रोडवरील श्री सोमेश्वर, गोदाघाटावरील श्री नारोशंकर, सराफ बाजारातील तिळ भांडेश्वर, घारपुरे घाटावरील सिद्धेश्वरसह अन्यही शिव मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली.

Shravan Somwar 2024: यंदा श्रावणात आला ७१ वर्षांनी दुर्मीळ योग
श्रावण विशेष | महादेवाला रुद्राभिषेक कसा करावा? रुद्राभिषेकाचे प्रकार किती ? जाणून घ्या नियम आणि मंत्र

पाच सोमवारी भगवान शंकरांना हे अर्पण करावे

  • ५ ऑगस्ट : तांदूळ

  • १२ ऑगस्ट : तीळ

  • १९ ऑगस्ट : मूग

  • २६ ऑगस्ट : जवस

  • २ सप्टेंबर : सातू

त्र्यंबकेश्वरला भरणार मेळा

यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यास सोमवारपासून प्रारंभ होत असून, पाच सोमवार आले आहेत. श्रावणात भगवान त्र्यंबकेश्वर यांच्या चरणी लीन होण्यासाठी राज्य-परराज्यातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी दाखल होत आहेत. तसेच ब्रह्मगिरीच्या फेरीमुळे त्र्यंबकेश्वरी भक्तांचा कुंभमेळा भरणार आहे.

२०४२ ला श्रावण अधिक मास

सन २००६ मध्ये श्रावणात पाच सोमवार आले होते. त्यानंतर १८ वर्षांनंतर यंदा श्रावणात पाच सोमवार आले आहेत. गेल्या वर्षी अधिक मास व श्रावण एकत्रित आल्याने दोन महिने श्रावण महिना साजरा करण्यात आला होता. सन २०२६ मध्ये ज्येष्ठ अधिकमास येणार आहे. तर १८ वर्षांनंतर म्हणजेच २०४२ मध्ये श्रावण व अधिकमास एकत्रित येणार आहे.

आराधनेचा काळ श्रावण. श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली आहे. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केली जातात. श्रावणातच नागपंचमी, राखीपौर्णिमा, विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, शीतल सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे सण-उत्सव आहेत. श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते.

डॉ. नरेंद्र धारणे , धर्मशास्त्र अभ्यासक, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news