श्रावण विशेष | महादेवाला रुद्राभिषेक कसा करावा? रुद्राभिषेकाचे प्रकार किती ? जाणून घ्या नियम आणि मंत्र

Shravan Special | रुद्राभिषेक का केला जातो?
Shravan Special, Rudrabhishek
Photo by Raj Soni : https://www.pexels.com
Published on
Updated on

रुद्रभिषेकाचा थेट संबंध भगवान महादेवाशी आहे, आपण शिवाला रुद्र अवतार मानतो. रुद्राभिषेकाचा अर्थच आहे रुद्राचा अभिषेक म्हणजे भगवान शिवाचा अभिषेक. हिंदू धर्मानुसार मनुष्याने केलेले पाप त्याच्या दुःखाचे कारण बनते. मान्यता अशी आहे की व्यक्तीच्या कुंडलीत असलेले पाप दूर करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो, आणि त्याचे विशेष लाभ मिळतात. रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक जीवनातील दुःखांपासूनही मुक्ती मिळते. भोलेनाथ कृपाळू आहेत, ते आपल्या भक्तांची भक्ती पाहून त्यांच्यावर लवकर कृपा करतात आणि त्यांचे दुःख दूर करतात. या लेखाच्या माध्यमातून आपण रुद्राभिषेकाचे महत्त्व समजून घेऊ आणि या अभिषेकाबाबतीच संपूर्ण माहिती घेऊ. (Shravan Special)

रुद्राभिषेकाचे प्रकार किती? | Shravan Special

रुद्राभिषेक मुख्यतः ६ प्रकार केला जातो. जल अभिषेक, मध अभिषेक, दही अभिषेक, दूध अभिषेक, पंचामृत अभिषेक आणि तुपाचा अभिषेक

रुद्राभिषेकाशी संबंधित नियम

  • रुद्राभिषेक करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक करावे

  • नदीपात्राच्या बाजूला किंवा पर्वताच्या जवळ स्थित असलेल्या शिवमंदिरात रुद्राभिषेक करणे जास्त फलदायी ठरते.

  • मंदिराच्या गर्भगृहात स्थापित शिवलिंगावर अभिषेक करणे जास्त फलदायी असते.

  • जर तुमच्या घरी शिवलिंग स्थापित असेल, तर घरही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता.

  • समजा तुमच्या जवळपास शिवलिंग नसेल तर स्वतःच्या हाताच्या अंगठ्याला शिवलिंग मानून त्याचा रुद्राभिषेक करू शकता.

  • तुम्ही जलाभिषेक करत असाल तर तांब्याचे पात्र वापरावे.

  • रुद्राभिषेक करताना रुद्राष्टाध्यायी मंत्राचा जप करणे फलदायी सिद्ध होते.

Shravan Special, Rudrabhishek
युधिष्ठिराने कुत्र्यासाठी स्वर्ग का नाकारला होता? अखेर देवांनी काय निर्णय घेतला?

रुद्राभिषेकाचा विधी

जर एखादी व्यक्ती काही विशेष समस्यांनी त्रस्त असेल तर, अशा स्थितीमध्ये भगवान शिवाचा रुद्राभिषेक केल्याने या समस्यांपासून मुक्ती मिळते. हिंदू धर्मात भगवान महादेवाची पूजा विधी अत्यंत प्रभावी मानली जाते. रुद्राभिषेकाच्या माध्यमातून पूर्वजन्माच्या पापांतून मुक्ती मिळते, असे मानले जाते. व्यक्ती ज्या कामनेने रुद्राभिषेक करत आहे, त्या संबंधित द्रव्यांनी भगवान शिवाचे अभिषेक केला पाहिजे.

रुद्राभिषेक मंत्र

ॐ नम: शम्भवाय च मयोभवाय च नम: शंकराय च

मयस्कराय च नम: शिवाय च शिवतराय च ॥

ईशानः सर्वविद्यानामीश्व रः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपति

ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोय्‌ ॥

तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि।

तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

अघोरेभ्योथघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः

सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररुपेभ्यः ॥

वामदेवाय नमो ज्येष्ठारय नमः श्रेष्ठारय नमो

रुद्राय नमः कालाय नम:

कलविकरणाय नमो बलविकरणाय नमः

बलाय नमो बलप्रमथनाथाय नमः

सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः ॥

सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः ।

भवे भवे नाति भवे भवस्व मां भवोद्‌भवाय नमः ॥

नम: सायं नम: प्रातर्नमो रात्र्या नमो दिवा ।

भवाय च शर्वाय चाभाभ्यामकरं नम: ॥

यस्य नि:श्र्वसितं वेदा यो वेदेभ्योsखिलं जगत् ।

निर्ममे तमहं वन्दे विद्यातीर्थ महेश्वरम् ॥

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिबर्धनम्

उर्वारूकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मा मृतात् ॥

सर्वो वै रुद्रास्तस्मै रुद्राय नमो अस्तु ।

पुरुषो वै रुद्र: सन्महो नमो नम: ॥

विश्वा भूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जायामानं च यत् ।

सर्वो ह्येष रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु ॥

Shravan Special, Rudrabhishek
श्रीकृष्णाने मोहिनीचे रूप का घेतले? पांडवांसाठी इरावण बळी का गेला?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news