Trimbakeshwar Temple: श्रावणात त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताय? मंदिराच्या वेळा, कोणते पास बंद वाचा सविस्तर

Trimbakeshwar Temple Timings: विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार नियोजन फलकाच्या माध्यमातून प्रसिद्ध
Trimbakeshwar Jyotirling Temple
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Pudhari File Photo
Published on
Updated on
Summary
  • श्रावण महिन्यात भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन वेळा आणि नियोजन जाहीर

  • श्रावण महिन्यात दररोज मंदिर दर्शनासाठी पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार

  • विश्वस्त मंडळाच्या सुचनेवरुन येत्या २३ ऑगस्टपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद

Trimbakeshwar Temple Timings in Shravan Month

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : श्रावण महिन्यात भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने शुक्रवार (दि. २५) पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन वेळा आणि नियोजन जाहीर केले आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार शहरातील विविध भागांमध्ये हे नियोजन फलकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दररोज मंदिर पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार

श्रावण महिन्यात दररोज मंदिर दर्शनासाठी पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार असून, श्रावण सोमवारी ही वेळ पहाटे ४:०० पासून सुरू होईल. स्थानिक ग्रामस्थांना विशेष सवलती दिल्या असून, त्यांना सकाळी मंदिर उघडल्यापासून १०:०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत दर्शनाची संधी दिली जाईल. मात्र, स्थानिक असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील. ग्रामस्थांसाठी प्रवेश उत्तर दरवाजातून (जाळीगेट) दिला जाईल.

धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजातून व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून असेल. भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामस्थांसाठी सात दिवस सकाळी ६:०० ते १०:०० या वेळेत पश्चिम द्वारातून प्रवेश मिळणार आहे.

ट्रस्टने वातानुकूलित दर्शन रांगा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Trimbakeshwar Jyotirling Temple
Shravan mahina 2025: श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ, यंदा 4 सोमवार, शिवमुठीसाठी धान्य काेणते वाचा?

23 ऑगस्टपर्यंत त्र्यंबकराजाचे व्हीआयपी दर्शन बंद

श्रावणमासात त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी होत असते. परिणामी, मंदिर प्रशासनावर मोठा ताण निर्माण होतो, या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाच्या सुचनेवरुन येत्या २३ ऑगस्टपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

श्रावणमासात त्र्यंबकेश्वरमध्ये अलोट गर्दी होत असते. प्रत्येक श्रावण सोमवारी ब्रम्हगिरी डोंगराला प्रदक्षिणा मारणाऱ्या भाविकांची मांदियाळी पहायला मिळते. याशिवाय कुशावर्त स्नान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी दर्शन, नीलगिरी पर्वत दर्शनासाठी लाखो भाविक त्र्यंबकमध्ये दाखल होतात. परिणामी, त्र्यंबकेश्वरला जत्रेचे स्वरुप येते. यातून दर्शनार्थ भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा स्थितीत व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांमधून नाराजीचा सूर उमटतो. याशिवाय मंदिर प्रशासनावरही ताण वाढण्याची भीती लक्षात घेऊन विश्वस्त मंडळाच्या सूचनेनुसार आजपासून अति महत्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून, राज्यस्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणार्‍या राज्यशिष्टाचार संबंधी लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन 23 ऑगस्टपर्यंत बंद राहील, असे त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news