देवळा : तालुक्यातील जनतेने लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत देवळा- चांदवड मतदारसंघातून महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन खा. डॉ अमोल कोल्हे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी (दि.२३) रात्री पाच कंदीलवर दाखल झाली. यावेळी ते बोलत होते. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा. भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मंत्री रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, मविप्र संचालक विजय पगार, डॉ. विश्राम निकम, सुनील आहेर, लक्ष्मीकांत आहेर, विलास देवरे, दिलीप आहेर, प्रा. सतीश ठाकरे, सरपंच स्वप्नील पाटील, नगरसेविका ऐश्वर्या आहेर आदी उपस्थित होते.