Dada Bhuse | नाशिकमध्ये शिवसेनेची 'गुप्त' बैठक; मंत्री गुलाबराव पाटील अन् दादा भुसेंच्या उपस्थितीने खळबळ!

Dada Bhuse | उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीने चर्चांना उधाण : मंत्री गुलाबराव पाटील, भुसे यांची उपस्थिती
Dada Bhuse
Dada BhusePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील मोजक्या पदाधिकाऱ्यांची रविवारी (दि. ३०) नाशिकमध्ये 'गुप्त' बैठक झाली. मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमधील १४ व्या मजल्यावर दुपारी २.३० ला झालेल्या या बैठकीला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

Dada Bhuse
MP Rajabhau Waje | नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अद्याप अंतिम नाही; खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे, बैठकीबाबत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही कमालीची गुप्तता ठेवल्याने या बैठकीनिमित्ताने पक्षांतर्गत कोणत्या मुद्द्यांवर खलबते झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील मोजकेच पदाधिकारी या बैठकीस उपस्थित असल्याचे समजत आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांना दोन्ही मंत्र्यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी काळातील राजकीय आव्हाने तसेच शिवसेनेची पुढील वाटचाल याबाबत बैठकीत मंथन झाल्याचे समजते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मात्र, बैठकीतील चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही याबाबत मौन बाळगले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, बहुतांश पदाधिकाऱ्यांनी 'बैठकीबाबत आपल्याला माहितीच नाही', असे सांगितले.

काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीबाबत माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला, तर काहींनी बैठकीत झालेल्या चर्चेवर भाष्य करणे टाळले. नाशिकमधील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी काही जण या बैठकीपासून दूर राहिल्याचेही दिसून आले. त्यामुळे ही बैठक नेमकी कोणत्या पातळीवर आणि कोणत्या कारणासाठी झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Dada Bhuse
Nashik SIR | नाशिक जिल्ह्यात एसआयआरची प्रारूप मतदारयादी आज प्रसिद्ध; 10 लाख मतदारांची नावे टांगणीला?

राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीतील चर्चेचा तपशील अधिकृतपणे समोर आला नसला तरी आगामी काळातील राजकीय रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महानगरप्रमुख बाहेरगावी

महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे रविवारी बाहेरगावी असल्याने त्यांना बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. मात्र, त्यांनीही बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. पक्षाचे गटनेते अजय बोरस्ते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

बैठकीभोवती गूढ कायम

उत्तर महाराष्ट्रातील बैठकीसाठी मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीची माहिती स्थानिक पातळीवरही फारशी उघड होऊ नये, याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नेमके कोणते राजकीय 'गणित' मांडले गेले, याची उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news