Shiv Jayanti 2025 | शिवजयंती मिरवणूक मार्गावर वाहतूक मार्गात बदल

शिवजयंती पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर वाहतुकी टाळण्यासाठी बदल
Road Closed, Diversion, Nashik
वाहतूक मार्गात बदलPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : शहरात बुधवारी (दि.19) साजर्‍या होणार्‍या शिवजयंती पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर वाहतुकी टाळण्यासाठी बदल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांकडून हद्दीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्याची मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मार्गावरील वाहतूक बंद

वाकडी बारव (चौक मंडई) जहांगिर मशिद, दादासाहेब फाळकेरोड चौक (दुध बाजार चौक) भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर (गाडगे देशपांडे पथ) धुमाळ पॉईट, सांगली बँक सिग्नल, महात्मागांधी रोड रोड (जुना आग्रारोड) अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कांरजा, महात्माफुले मार्केट, अब्दुल हमीद पुतळा, मेनरोड, (गो. ह. मेहेर सिग्नल स्वामी विवेकानंद होळकर पुल मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक परशुराम पुरीया रोडने रामकुंड येथे समारोप अशी मिरवणुक निघणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक बुधवार (दि.19) रोजी दुपारी 12 ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. यावेळी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

पंचवटी एस. टी. डेपो क्रमांक 2, निमाणी बसस्थानक तसेच पंचवटी कारंजा येथुन सुटणा-या शहर वाहतुकीच्या सर्व सिट लिंक बसेस हया पंचवटी डेपो येथुन सुटतील तसेच ओझर दिंडोरी, पेठ येथुन शहरात येणा-या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवारपुल व पुढे व्दारका सर्कलकडुन नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील तसेच पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने व्दारका सर्कल कन्नमवार पुलावरुन जातील. तसेच रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथुन सुटणा-या शहर वाहतूकीच्या सर्व बसेस शालीमार येथुन सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.

Road Closed, Diversion, Nashik
Shiv Jayanti 2025 | शिवरायांच्या पुतळ्याचे आज लोकार्पण

पंचवटी ठाणे हद्दीत या मार्गावर प्रवेश बंद

वाहतुकीस' प्रवेश बंद मार्ग (दि.18/02/2025 रोजी दु. 15.00 वा. ते रात्री 24:00 वा. पावेतो) पंचवटी कारंजावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचे आज मंगळवारी (दि.18) अनावरण करण्यात येणार असल्याने दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

पंचवटी - वाहतुकीस बंद करण्यात आलेले रस्ते असे...

  1. मालेगांव स्टॅण्ड ते - इंद्रकुंड पंचवटी कारंजा दिंडोरी नाका (पुरीया पार्क)

  2. मखमलाबाद नाका व चिंचबन कडुन मालेगांव स्टॅण्डकडे येणारा मार्ग

वाहतुकीस पर्यायी मार्ग असे...

  1. दिंडोरी नाका पेठ नाका मखमलाबाद नाका रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र जातील.

  2. दिंडोरी नाका- पेठ नाकामखमलाबाद नाका चोपडा लॉन्स मार्गे इतरत्र जातील.

  3. संतोष टी पॉईंट कडुन दिंडोरी नाका

  4. काटया मारूती सिग्नलकडून दिंडोरी नाका

  5. तारवाला सिग्नलकडुन दिंडोरी नाका

वाहतुकीस 'पर्यायी मार्ग'

  • छत्रपती संभाजीनगर नाका चौकातुन हिरावाडी मार्गे, व्दारका सर्कल मार्गे इतरत्र जातील.

  • लक्ष्मण झुला मार्गे, हिरावाडी मार्गे इतरत्र जातील.

  • प्रवेश बंद कालावधीत वाहनचालकांनी गर्दीचे मार्ग सोडुन तत्सम पर्यायी मार्गाचा वापर करावा.

  • पंचवटी एस. टी. डेपो क. 2. सिटी लिंक बस स्टॅण्ड, तपोवन, निमाणी तसेच पंचवटी कारंजा येथुन सुटणार्‍या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपो येथुन सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथुन शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगांव नाका, कन्नमवार पुल, पुढे व्दारका सर्कल कडुन नाशिक शहर, नाशिकरोड व इतर ठिकाणी जातील. तसेच पंचवटी कडे जाणारी सर्व वाहने व्दारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील व येतील.

  • हे निर्बंध आज मंगळवारी (दि.18) रोजी दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि उद्या बुधवारी (दि.19) रोजी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

Road Closed, Diversion, Nashik
Shiv Jayanti 2025 | उद्या 'जय शिवाजी-जय भारत'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news