Shirdi Sai Baba Sansthan | साईबाबा संस्थानला यंदा 638 कोटी, 16 किलो सोन्याची देणगी

Shirdi Sai Baba Sansthan | संस्थानचे २०२४-२५ मधील उत्पन्न होते ६४८ कोटी; १६ किलो सोने, १९७ किलो चांदी, ३,६०३ कोटींच्या ठेवी
Shirdi Sai Baba Sansthan
Shirdi Sai Baba SansthanFile Photo
Published on
Updated on

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वार्षिक उत्पन्नात यंदा १० कोर्टीची घट झाली आहे. मात्र, वस्तूरूपी दानात वाढही झाली आहे. २०२५-२६ मध्ये संस्थानचे उत्पन्न ६३८ कोटी रुपये इतके आहे. गतवर्षी हा आकड़ा ६४८ कोटी इतका होता. यंदा संस्थानला १६ किलो सोने आणि १२७ किलो चांदी दान रूपात मिळाली आहे. संस्थानच्या एकूण ३,६०३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शिर्डीत दरवर्षी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात.

Shirdi Sai Baba Sansthan
Pandharpur News: आषाढी यात्रेत १६ जुलैपासून २४ तास दर्शन

विदेशातील भाविकही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल होतात. यावेळी साईनगरीत आलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान टाकण्यात आले. अनेक भाविक सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपात शिर्डी साईबाबा संस्थानकडे वस्तू देऊन आपली इच्छापूर्ती करतात. आता संस्थानच्या गतवर्षीच्या वार्षिक उत्पन्नाचा लेखोजोखा समोर आला असून, २०२४-२५ च्या तुलनेत यंदा उत्पन्नात १० कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे.

साईबाबा संस्थानला वस्तू स्वरुपात १५ कोटींचे अतिरिक्त दान भक्तांकडून प्राप्त झाल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली. त्यामुळे वस्तुस्वरुपातील दान ग्राडा धरल्यास गतवर्षीच्या तुलनेत अधिक दान झाल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. साईबाबांच्या चरणी भाविकांनी वाहिलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी सोने-चांदीच्या स्वरूपातील देणगीत मोठी चाढ झाली आहे.

Shirdi Sai Baba Sansthan
Pandharpur Vitthal Temple | अधिकमासात ९ कोटी ४६ लाखांचे श्री विठ्ठल चरणी दान

२०२४-२५ मध्ये १३ कोटी २५ लाखांच्या वस्तू देणगी रूपात मिळाल्या होत्या. तथापि, २०२५-२६ मध्ये यातवाढ होऊन हे दान १९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अधिकमासात विठ्ठल चरणी ९.४६ कोटींचे दान पंढरपूर : अधिकमास कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श व मुख दर्शनासाठी १४ लाख ६० हजार ६८८ भाविकांनी हजेरी लावली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रोख देणगी तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले. विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस एकूण १ कोटी ४६ लाख २८ हजार २३३ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्रध्दा तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलो सोनेतुळजापूर: अधिकमासात तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत ८४१ ग्रॉम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत ६ कोटी ८५ लाखांची मर पडली आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास १७ मे १४ जून या कालावधीत साजरा करण्यात आला. या अधिकमासात भाठिकांनी तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत भरभरून दान टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news