Shalarth ID scam | शालार्थ आयडी प्रकरणी जामिनावर 20 ऑगस्टला सुनावणी; तिघांवर अटकेची टांगती तलवार कायम

Shalarth ID scam | शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी शरद दयाराम शिंदे, मनोज रामकृष्ण पाटील आणि पप्पू पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Shalarth ID Scam
Shalarth ID ScamPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी शरद दयाराम शिंदे, मनोज रामकृष्ण पाटील आणि पप्पू पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली.

Shalarth ID Scam
Goa Pension Benefits Issue | निवृत्तीवेतनाचे लाभ रोखल्याने गोवा राज्य सहकारी बँकेला दणका

यावेळी सरकारी वकिलांनी हा संघटित स्वरूपाचा गंभीर गुन्हा असून, शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्जावर तत्काळ निर्णय न देता पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी ठेवली आहे. परिणामी या तिघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यातील अन्य १७ संशयित आरोपींनीही अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. नाशिकरोड न्यायालयाने मागील आठवड्यात या प्रकरणातील एकूण १७ संशयित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते.

Shalarth ID Scam
Goa TCP notification | पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय! 9.7 लाख चौ. मीटर क्षेत्र 'विकास निषिद्ध' घोषित.

त्यामुळे सर्व संशयितांचे लक्ष आता उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागले आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, वेतन तसेच शासनाच्या आर्थिक निधीशी संबंधित प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक संशयितांची भूमिका तपास यंत्रणेकडून तपासली जात आहे. आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची निर्मिती आणि संबंधित व्यक्तींमधील संपर्क याबाबतही चौकशी सुरू आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात संघटित पद्धतीने हा प्रकार केल्याचे नमूद केल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळतो की संशयितांना तपासासाठी अटक केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news