Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शैव आणि वैष्णव आखाडे एकत्र येणार; गोदाघाटावर होणार संयुक्त महाआरती

Nashik Simhastha Kumbh Mela | गोदाघाटावर संयुक्त महाआरतीचे नियोजन; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक एकात्मतेचे दर्शन
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शैव आणि वैष्णव आखाडे एकत्र येणार असून, यानिमित्त गोदाघाटावर संयुक्त महाआरतीचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून या माध्यमातून साधू-संतांमधील एकात्मता आणि समन्वयाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह व गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

संयुक्त महाआरतीच्या नियोजनामुळे ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी नाशिकमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात सोमवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महंत भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ला, भालचंद्र पंचाक्षरी आदी उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

२५ ऑक्टोबरला विश्वविक्रमी शंखनाद:

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम होतील. यात २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शंखनाद होईल. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येईल.

याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफीटेबल बुकचे प्रकाशन, सायंकाळी गोदावरी नदीच्या आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

आगामी कार्यक्रमांची रूपरेषा सध्या प्राथमिक स्वरूपात असून, संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक निर्णय अंतिम करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक आणि परिसरातील हालचालींचे नियोजन यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक संस्था, आखाडे आणि संत-महंतांशी चर्चा करून त्यांच्या आवश्यकतांची माहिती घेण्यात येणार आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करताना संबंधित संस्थांचा सहभाग, भाविकांची ये-जा आणि सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता, पार्किंग यांचा विचार केला जाणार आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत.
दरम्यान, यावेळी भक्तिचरणदास महाराज यांनी आखाड्यांच्या माध्यमातून तसेच सतीश शुक्ल, भालचंद्र पंचाक्षरी यांनी पुरोहित संघाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली. त्यानुसार, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित ध्वजारोहण सोहळ्याकडे देशभरातील साधू-महंत आणि भाविकांचे लक्ष लागले आहे. विविध आखाड्यांचे साधू-महंत एकत्र येत गोदामातेची आरती करणार असल्याने या सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व लाभणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने धार्मिक परंपरा, साधू-संतांचा सहभाग आणि गोदावरीच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news