Godavari Maha Aarti | गोदामहाआरतीच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी उघड; रंगीत छायांकित पासच्या आधाराने तरुणाचा घुसखोरीचा प्रयत्न

Godavari Maha Aarti | पासच्या रंगीत प्रतीच्या आधाराने तरुणाचा घुसखोरीचा प्रयत्न, पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात
Sinhasta Kumbh Mela
Sinhasta Kumbh Mela Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्यानमित्त आयोजित गोदामहाआरती सोहळ्याच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रवेश परवानगीची रंगीत छायांकित प्रत वापरून एका तरुणाने कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवून ओळखपात्राबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

Sinhasta Kumbh Mela
President Droupadi Murmu | सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांमुळे नाशिक कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

त्यामुळे पासची पुन्हा तपासणी केली असता, त्याने माध्यम प्रतिनिधीच्या मूळ पासची रंगीत प्रत काढून तिचा गैरवापर केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, या प्रकारचा तपास सुरू आहे.
महाआरती सोहळ्यासाठी गोदाघाट परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही स्वतंत्र प्रवेश परवाने देण्यात आले होते. अशा परिस्थितीत एका तरुणाने माध्यम प्रतिनिधीची पासची रंगीत छायांकित प्रत घेऊन प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला.

Sinhasta Kumbh Mela
Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

पोलिसांनी त्याला रोखल्यानंतर संस्थेचे ओळखपत्र मागितले. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर प्रवेश परवान्याची बारकाईने तपासणी केली असता, तो मूळ पास नसून त्याची रंगीत प्रत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मात्र, या घटनेमुळे सुरक्षाव्यवस्थेतील तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी तीन ते चार ठिकाणी तपासणी केली जात असताना, रंगीत छायांकित पासच्या आधाराने संशयित तरुण प्रसारमाध्यमांसाठी राखीव मंचापर्यंत कसा पोहोंचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवेश परवान्यांची पडताळणी नेमकी कशी करण्यात आली आणि तपासणीतील त्रुटी कुठे राहिली, याचा तपासातून उलगडा होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.