Nashik School Security | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष पाहणी

Nashik School Security | सर्व शाळा-महाविद्यालयांत तपासणी
Pimpri Chinchwad Police Transfers
Pimpri Chinchwad Police TransfersPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष सुरक्षा पाहणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षाव्यवस्थेची तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

Pimpri Chinchwad Police Transfers
Shrigonda Police School Safety: शाळांबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांचा धडक अॅक्शन; दोन तरुण ताब्यात

या मोहिमेत विद्यार्थ्यांची सुरक्षा, शालेय बसची सुरक्षितता, सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी, कर्मचारी पडताळणी, 'पोक्सो' कायद्याबाबत जनजागृती, परिसरातील वाहतूक व्यवस्था, तसेच युवकांमध्ये वाढत्या नशेच्या व्यसनाविरोधात समुपदेशन यावर विशेष भर दिला जाणार आहे.

यासाठी पोलिस उपआयुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पाहणीदरम्यान शाळा प्रशासन, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, शालेय बसचालक व वाहक यांच्याशी संवाद साधून सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल.

Pimpri Chinchwad Police Transfers
Schoolgirls Safety : शालेय मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सज्ज

शाळेतील कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी, प्रवेशद्वारावरील तपासणी, विद्यार्थ्यांकडे अमली पदार्थ, शस्त्रे किंवा इतर धोकादायक वस्तू येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळेतील प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पार्किंग, वाहतूक कोंडी, शाळेभोवती होणारी टवाळखोरी, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ तसेच घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीही कोणतीही घटना अथवा समस्या निर्भयपणे पोलिसांकडे मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्रुटींची नोंद करून त्या मुदतीत दूर करा

शाळा भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची लेखी नोंद करून त्या निर्धारित मुदतीत दूर करण्याच्या सूचनाही संबंधित संस्थांना दिल्या जाणार आहेत. ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news