PAT Live Report | शाळांसाठी 'पॅट लाइव्ह रिपोर्ट' वापराबाबत विशेष ऑनलाइन प्रशिक्षण; 23 ऑक्टोबरला आयोजन

23 ऑक्टोबरला एससीईआरटीच्या यूट्यूब चॅनलवरून मार्गदर्शन
PAT Live Report
PAT Live ReportPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि नियतकालिक चाचण्यांचे निकाल विश्लेषण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने 'पॅट लाइव्ह रिपोर्ट' या सुविधेच्या वापराबाबत ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

PAT Live Report
Nashik Smart City | नाशिक स्मार्ट सिटीच्या 4.23 कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाचा जाब

हे प्रशिक्षण शुक्रवारी (दि. २३) सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षात किमान चार वेळा पालक-शिक्षक शैक्षणिक मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या मेळाव्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती, शैक्षणिक प्रगती आणि संपादणुकीबाबत पालकांना माहिती देणे आवश्यक आहे.

त्यासाठी नियतकालिक चाचणी निकालांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. एससीईआरटीच्या सूचनेनुसार, हे प्रशिक्षण एससीईआरटीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी "एससीईआरटी महाराष्ट्र यूट्यूब चॅनल (https://www.youtube.com/@SCERTMaharashtra)" उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रशिक्षणाचा व्हिडिओ पाहण्याची सुविधा असेल.

मुख्याध्यापक व शिक्षकांमधील 'पॅट लाइव्ह रिपोर्ट' सुविधेचा वापर करून आपल्या शाळेतील पॅट निकालांचे अवलोकन करावे. या सुविधेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा उपयोग पालक-शिक्षक शैक्षणिक मेळाव्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना समजावून सांगण्यासाठी करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

PAT Live Report
Nashik Groundwater Level | नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट; येवला तालुक्यात तीन मीटरपेक्षा अधिक पाणीपातळी खाली

यूट्यूबवरून प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण

'पॅट लाइव्ह रिपोर्ट'च्या माध्यमातून विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्तीनिहाय कामगिरी, वर्गनिहाय व विषानुसार प्रगती तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे विश्लेषण करता येणार आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात किंवा अध्ययन घटकात अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, हे शिक्षकांना समजण्यास मदत होईल.

या ऑनलाइन प्रशिक्षणामुळे शिक्षकांना 'पॅट'चे विश्लेषण, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे मूल्यमापन आणि त्यानुसार शैक्षणिक नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक ज्योती शिंदे यांनी सूचना जारी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news