Sarvesh Kushare | "देवगावच्या सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक विक्रम!; 2.30 मीटर उडी मारणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू"

Sarvesh Kushare | यासोबतच त्याने २०१८ मध्ये तेजस्वी शंकर यांनी केलेला २.२९ मीटरचा राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला.
Sarvesh Kushare | "देवगावच्या सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक विक्रम!; 2.30 मीटर उडी मारणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू"
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील देवगावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेला उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या ६५ व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीत २.३० मीटर उडी मारत तो हा टप्पा गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. यासोबतच त्याने २०१८ मध्ये तेजस्वी शंकर यांनी केलेला २.२९ मीटरचा राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला.

Sarvesh Kushare | "देवगावच्या सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक विक्रम!; 2.30 मीटर उडी मारणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू"
Lone Wolf Attack | ‘लोन वुल्फ अटॅक’च्या उंबरठ्यावर भारत?

या ऐतिहासिक कामगिरीदरम्यान सर्वेशने २.३१ मीटर उडीही यशस्वीरीत्या पार करत २०२६ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मोनिका आथरेनंतर तो नाशिक जिल्ह्यातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या कामगिरीबद्दल सर्वेशचे मित्रपरिवार व ग्रामस्थ, श्री. डी. आर. भोसले विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक जतीन थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे.

भुशाच्या पोत्यापासून राष्ट्रीय विक्रमापर्यंत..

ग्रामीण भागातील अत्यंत मर्यादित सुविधांमध्ये, मक्याच्या भुशाच्या पोत्यावर सराव करत सुरू झालेला सर्वेशचा प्रवास आज भारतीय ॲथलेटिक्सच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने देशातील प्रत्येक युवा खेळाडूसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.

Sarvesh Kushare | "देवगावच्या सर्वेश कुशारेचा ऐतिहासिक विक्रम!; 2.30 मीटर उडी मारणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू"
Landslide | कोसळणारे डोंगर

सर्वेश यापूर्वी पॅरिस ऑलिंपिक, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत आला आहे. २०२२ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २.२७ मीटर उडीसह सुवर्णपदक, बँकॉक आशियाई स्पर्धेत पदक, २०२० दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक तसेच नुकत्याच कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत २.२५ मीटर उडीसह सुवर्णपदक अशी त्याच्या नावावर उल्लेखनीय कामगिरी आहे.

"सर्वेशच्या या कामगिरीने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत तो भारतासाठी आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वास आहे."

ना. छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

"देवगावसारख्या खेड्यात कोणत्याही सुविधा नसताना माझ्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑलिंपिक, वर्ल्ड ॲथलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारली. एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमान असू शकत नाही. अत्यंत कष्टातून त्याने हे यश मिळविले असून, त्याच्या परिश्रमाचे आज चीज झाले."

अनिल कुशारे, सर्वेशचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news