Sanjay Raut ...तर लुटीचे पैसे उधळणाऱ्यांना हंटरने फोडले असते

शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंदाश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारे आहेत. हे व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो, असे नमूद करत, आनंद दिघे असते, तर आश्रमाच्या भिंतीवरील हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्यांना फोडून काढले असते, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर आसूड ओढले आहेत. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीदेखील राऊत यांनी केली आहे. राऊत हे शनिवारी (दि. 14) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

खा. राऊत म्हणाले की, शुक्रवारी आनंदाश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आनंद दिघे यांना ते गुरू मानत असतील, तर अशा प्रकारे त्यांनी केले नसते असा टोला लगावत लुटीच्या पैशांतून असे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावरही राऊतांनी टीका केली. गृहमंत्री अमित शहा मुंबईला आले, त्या आधी २० कोटी रुपयांचा मुकुट लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आला होता, असा आरोपही राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनाही पळावे लागेल

जामनेर मतदारसंघात फिरताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना मतदारांना रस्त्यांवरून जाब विचारत, हुसकावून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर भाष्य करताना राऊत यांनी केवळ महाजनच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील सर्वांवरच पळून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीआधी सर्व जण पळून जातील, अशी टीकाही त्यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news