

Deola Nagar Panchayat Sanjay Aher Elected
देवळा : देवळा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी संजय तानाजी आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपनगराध्यक्ष मनोज राजाराम आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदाच्या निवडीसाठी गुरुवारी (दि .१५) दुपारी १२ वाजता तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली देवळा नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी संजय आहेर यांना सूचक म्हणून जितेंद्र आहेर यांनी तर अनुमोदन म्हणून मनोज आहेर यांनी स्वाक्षरी केली. उपनगराध्यक्ष पदासाठी संजय आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी नगराध्यक्षा भाग्यश्री पवार , माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलभा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, शीला आहेर, कैलास पवार, राखी भिलोरे, करण आहेर, रत्ना मेतकर, ऐश्वर्या आहेर, भूषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी, स्वीकृत नगरसेवक योगेश आहेर, हितेश आहेर, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष पदी संजय आहेर यांची निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी पाचकंदिल व शिवस्मारक परिसरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला .