

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - पक्षाबरोबरच महिलांची बाजू आक्रमक मांडणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले आहे.
विरोधकांच्या हल्ल्याला सडेतोडपणे, आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या, प्रत्येक विषयांची मुद्देसूद मांडणी करणाऱ्या अशी रुपाली चाकणकर यांची ओळख आहे. रुपाली चाकणकर यांना पुन्हा पुढील तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 2021 पासून त्या हे अध्यक्षपद भूषवित आहेत.