Rupali Chakankar |सुनेत्रा पवारांच्या आदेशानंतर राजीनामा? रूपाली चाकणकरांच्या एक्झिटमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Rupali Chakankar | राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची मागणी
Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Sunetra Pawar on Rupali Chakankar resignationfile photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली.

Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Ashok Kharat Case | भोंदू खरातचा नवा कारनामा! 'कृष्ण अवतार' सांगून नेवाशाच्या व्यापाऱ्याला पावणेतीन लाखांचा गंडा

अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रूपाली चाकणकर यांनी सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रूपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता.

आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे रूपाली चाकणकरांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेर यांनी मात्र, चाकणकरांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

Sunetra Pawar on Rupali Chakankar resignation
Goa Cyber Police | म्हापशातील बंगल्यात 'इंटरनॅशनल' ठगबाजी! अमेरिकन नागरिकांना लुटणारे ७ सायबर गुन्हेगार गजाआड

आहेर म्हणाले की, खरे तर या नैतिक जबाबदारी प्रकरणात स्वीकारून पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला चाकणकर यांनी हवा होता. मात्र, आम्ही सातत्याने भूमिका लावून धरल्यामुळे अखेर त्यांना राजीनामा देण्याची उपरती झाली.

किंबहुना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यामुळे पक्षाची भविष्यात होणारी बदनामी व नुकसान टळले आहे. रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना तत्काळ अटक करून शेकडो महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहेर यांनी सरकारकडे केली आहे.

भोंदूबाबा खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी.

- उदय आहेर, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news