नाशिक : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनय पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी रामकुंड येथे सोमवारी (दि. ३०) पाटील यांच्या अस्थी विसर्जन केल्या.
कॉंग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले. त्यांचे अस्थी विसर्जन सोमवारी (दि. ३०) सकाळी रामकुंड परिसरात झाले. याप्रसंगी काँग्रेसचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कन्या डॉ. स्मिता पाटील, सून रुची पाटील, नात अहिल्या पाटील, नातू रायबा पाटील यांच्यासह धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खा. डॉ. शोभा बच्छाव, गुजरात विधानसभा माजी विरोधी पक्षनेते परेश धनाणी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, डॉ. ममता पाटील, काँग्रेस पदाधिकारी शरद आहेर, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, वसंत गिते, वत्सला खैरे, स्वाती जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.