

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील प्रदीर्घ अनुभव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च प्रशिक्षित असलेले प्रख्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अंबरीश चटर्जी हे एसएमबीटी हॉस्पिटल व कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये पूर्णवेळ कन्सलटंट म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या सेवेमुळे नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे व पालघर जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना जटिल कॅन्सर शस्त्रक्रियांचे अत्याधुनिक उपचार जवळच उपलब्ध होणार आहेत.
डॉ. चटर्जी यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून सर्जिकल ऑन्कोलॉजीतील एम.सी.एच. पदवी संपादन केली असून, त्यांना या क्षेत्रातील दहा वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. इटलीतील मिलान येथील प्रतिष्ठित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सायटोरिडक्टिव्ह सर्जरी व HIPEC चे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
तसेच मल्टी-ऑर्गन कॅन्सर शस्त्रक्रियांचे उच्च प्रशिक्षण त्यांनी घेतले असून, त्यांचे २५ हून अधिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
जठर व आतड्यांचा कर्करोग, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय, गर्भाशय व अंडाशयाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियांमध्ये डॉ. चटर्जी यांना विशेष प्राविण्य आहे.
लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक पद्धतीच्या मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया तसेच आव्हानात्मक लिव्हर रिजेक्शनमध्येही त्यांचा विशेष अनुभव आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत एसएमबीटीचा तांत्रिक मार्गदर्शनाचा करार असल्याने उपचारांच्या दर्जाला आणखी बळ मिळाले आहे.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना येथे मोफत उपचार, केमोथेरपी व शस्त्रक्रिया येथे उपलब्ध आहे. डॉ. चटर्जी यांची ओपीडी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत सुरू राहणार आहे. एसएमबीटीमध्ये सर्जिकल, मेडिकल, बालरोग व हेमॅटो ऑन्कोलॉजीतील तज्ज्ञांची टीम कार्यरत असून, बोन मॅरो ट्रान्सप्लांट व CAR-T सेल थेरपीची सुविधाही उपलब्ध आहे. लवकरच पेट स्कॅन व रेडिएशन थेरपी सुरू होणार असल्याने एसएमबीटीची 'कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर केअर सेंटर'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
डॉ. अंबरीश चटर्जीकर्करोग शल्यचिकित्सा तज्ज्ञ (एम. सी. एच. सर्जिकल ऑन्कोलॉजी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई)
कन्सलटंट - एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूट एसएमबीटी हॉस्पिटल