

नाशिक : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अतिरिष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता आतापर्यंत फक्त ६३ टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचली आहे. असून अद्याप 37 टक्के शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ७८ कोटी ४ लाख २३ हजार इतकी रक्कम वर्ग झाली आहे. दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पोहोचणार असा सरकारचा दावा शासनाने केला होता. प्रत्यक्षात अद्याप अनेक शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक नुकसान झालेल्या मालेगाव तालुक्यात सर्वात कमी ४८.२५ टक्केच मदत प्राप्त झाली असून २६ हजार ७०३ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ कोटी ३१ लाख ७२ हजार रक्कम जमा झाली आहे. तर २७ हजार ६९९ शेतकरी म्हणजेच तालुक्यात ५२ टक्के शेतकरी भरपाईची वाट पाहत आहेत. पाठोपाठ देवळा तालुक्यातही ४९.५७ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली निम्मे अधिक शेतकरी वंचित आहेत.
नाशिक विभागात चार लाख १८ हजार हून अधिक शेतकऱ्यांचे दोन लाख ८८ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रांतवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी ३१७ कोटी १५ लाख ७६ हजार इतक्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. जिल्ह्यात मका, स्वयबीन, कांदे, कापूस सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के पैसे येणार असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्याला धीर मिळालाला होता. प्रत्यक्षात अद्याप जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार ६०८ शेतकरी वंचित आहेत.