Ravana Dahan at Nashik : रावण दहणाने वाईटांवर चांगल्याचा विजयोत्सव

दहन बघण्यासाठी अलोट गर्दी; सियाँवर रामचंद्र की जय चा जयघोष
पंचवटी, नाशिक
नाशिक : वाईटावर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीला गोदाघाटावर रावणदहन करण्यात आले. तो क्षण बघण्यासाठी गोदाघाटावर मोठी गर्दी झाली होती.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीचा सण रावण दहनाने उत्साहात साजरा झाला. ५८ वर्षांची जुनी परंपरा असलेल्या चतु:संप्रदाय आखाड्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने गोदापटांगणावर रावण दहण करण्यात आले. त्यानिमित्ताने निघालेल्या विजयी मिरवणूकीत प्रभू श्रीरामासह सितामाई लक्ष्मण, हनुमान यांसह रावण-वानरसेनेच्या प्रतीकात्मक लढाईने उपस्थितांची मने जिकंली.

पंचवटीतील कपालेश्वर मंदिरासमोरील चतु:संप्रदाय आखाड्यातर्फे व्यंकटेश बालाजी मंदिरातर्फे नवरात्रोत्सातील दशमीनिमित्त रावण दहनासाठी ८ ते १० हजार नागरिकांची गोदाकाठी गर्दी केली. काळाराम मंदिर ते रामकुंड अशी मिरवणुक काढली जाते. त्यामध्ये प्रभूश्री राम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमान यांच्यासह वानरसेना आदी वेषभूषेत भाविकानी सहभागी होते. श्री राम-रावणामधील युद्धाचे प्रसंग प्रतिकात्मक युद्ध केेले. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित बाणाने रावणाचे दहन करण्यात आल्यानंतर भाविकांनी 'सियँावर रामचंद्र की जय' चा जयघोष केला. दहणापूर्वी आणि नंतर प्रचंड फटाक्यांची आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.

दरम्यान, व्यंकटेश्वराची विशेषारती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आहिल्याबाई पुतळयावर दहण बघ्यण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पुलावर काही काळ वाहतुककोंडी झाली होती.

पंचवटी, नाशिक
Ravana Dahan : आज ५१ फुटी रावणदहन : विजयोत्सवाची तयारी पूर्ण

कुंभकर्ण, मेघनाद, वानरसेना युद्ध

पंचवटीतून श्रीरामाची विजयोत्सवी मिरवणुक गोदापटांगणावर आल्यानंतर मारुती इंद्रजीत यांच्या युद्ध प्रतीकात्मक रित्या झाले. त्यानंतर रावण, कुंभकर्ण, मेेघनाद, यांच्यासह राम लक्ष्मण यांनी युद्धात भाग घेऊन सर्व आसुरांचा नाश करण्यात आला. शेवटी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहण होताच उपस्थितांनी विजयोत्सवाचा एकच जल्लोष केला.

नाशिक
नाशिकरोड : गांधी नगर येथे रावण दहनवेळी घनघोर युद्ध.Pudhari News Network

Ravana Dahan : जय श्रीरामाच्या जयघोषात रावणदहन

गांधीनगरला राम रावणाचे युद्धाचे दृष्य ठरले आकर्षक

नाशिकरोड : सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय अशा जयघोषात गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलीलेत रावण दहन करण्यात आले.

विजयादशमीला जल्लोषपूर्ण वातावरणात, फटाक्यांच्या नेत्रदिपक आतषबाजीत रावण दहन करण्याची प्रथा गांधीनगर येथे ७० वर्षांपासून पाळली जात आहे. रावणाची ५० फूट प्रतिकृती तयार करण्यात आली. गांधीनगरची रामलीला आणि रावणदहन संपूर्ण शहरात खास आकर्षण ठरले. रामलीला समितीतर्फे गांधीनगर येथील मैदानावर रामलीला सादर करण्यात आली. विजयादशमीच्या संध्येला श्रीरामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्यात घनघोर युद्ध झाले. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतर रावणाच्या भव्य प्रतिमेचे दहन करण्यात आले. या वेळी तब्बल ३५ कलाकारांनी श्री राम आणि रावणाच्या सेनेची भूमिका साकारली होती.

दरम्यान, नाशिक रोडच्या बिटको चौकाशेजारील मोकळ्या मैदानातही रावण दहन व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तसेच गांधीनगरच्या कार्यक्रमावेळी आयुक्त मनीषा खत्री, अभिनेता चिन्मय उदगीरकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपयुक्त किशोर काळे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, सुरेश पाटील, रामलिला समितीचे महासचिव कपिल शर्मा, कार्याध्यक्ष अनिल ताजनपुरे, मनोहर बोराडे, रवी पगारे, दसरा अध्यक्ष जसबीर कोहिली, दिग्दर्शक प्रदीप भुजबळ, संजय लोळगे, दिलबागराय त्रिखा यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news