Ram Navami Nashik | रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

Ram Navami Nashik | रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील पंचवटी व नाशिकरोड परिसरात रामनवमी साजरी केली जाते. यानिमित्ताने मिरवणूक काढली जात असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. पोलिस बंदोबस्ताच्या नियोजनासह वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. (Ram Navami Nashik)

नाशिकरोड येथे बुधवारी (दि.१७) रामनवमी निमित्त मुक्तिधाम मंदिरापासून दुपारी तीन वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, सत्कार पॉईंटकडून देवळाली गाव मार्गे मुक्तिधाम मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग आहे. या मिरवणुकीमध्ये २० ते २५ हजार भाविक सहभागी होत असल्याने या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्यासह नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर व इंदिरानगर पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांसह २५० पोलिस, राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मिरवणुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हे बदल बुधवारी (दि.१७) दुपारी तीन ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (Ram Navami Nashik)

प्रवेश बंद मार्ग (Ram Navami Nashik)

– सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नल मार्गावरील वाहतूक बंद

– रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणारा मार्ग वाहतूकीस बंद

– दत्त मंदिर सिग्नल – बिटको चौक मार्गे रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद

– डॉ. आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद

पर्यायी मार्ग

– उपनगरकडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर सिग्नलच्या उजवीकडून सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी पॉईट – सत्कार पॉईंट – रिपोर्टे कॉर्नर येथून रेल्वे स्टेशनकडे- परत सुभाष रोड मार्गे – दत्त मंदिरा सिग्नल इतरत्र वळवण्यात येणार आहे.

– रेल्वे स्टेशनकडून सीबीएसकडे जाणारी वाहने जुने नाशिकरोड कोर्ट समोरून आर्टिलरी रोड मार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलकडून इतरत्र जातील.

– पुणेकडून नाशिककडे येणारी-जाणारी अवजड वाहने, बसेस दत्त मंदिर सिग्नल येथून वीर सावरकर उड्डाणपुलावरून मार्गस्थ होतील.

– विहितगाव सिग्नलकडून बिटकोकडे जाणारी वाहतूक देवळाली गाव, मालधक्का रोडने रेल्वेस्टेशनकडे जाईल.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news