Drugs Racket | राजस्थान ते साक्री ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

Rajasthan To Sakri Drugs Racket | राजस्थान ते साक्री ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ८२ किलो डोडा जप्त; रोख रक्कम व वाहने जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा
Lonavala MD Case
Lonavala MD CasePudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'नशामुक्त नाशिक' अभियानांतर्गत नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ८२ किलो २६४ ग्रॅम डोडा (पॉपी स्ट्रॉ), रोख रक्कम, वजनकाटा आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Lonavala MD Case
Morjim Illegal Constructions | मोरजीतील 23 बेकायदा बांधकामांवर 'बुल्डोझर', उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई

उपनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी मुकेश गोवर्धनराम विश्नोई आणि भरत भिकाराम विश्नोई (रा. जोधपूर, राजस्थान) यांचा शोध घेण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथक राजस्थानला रवाना झाले होते.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे हे आरोपी साक्री तालुक्यातील कोंडाईबारी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिथे सापळा रचत समर्थळा हॉटेल परिसरातून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, साक्री येथील सुयोग कॉलनीतील भाड्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर डोडा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.

Lonavala MD Case
Karnataka Tourist Suicide | कर्नाटकातील पर्यटकाची हॉटेलमध्ये आत्महत्या

त्यानुसार पाच गोण्यांमध्ये ८२ किलो २६४ ग्रॅम डोडा (पॉपी स्ट्रॉ) आढळून आला. याशिवाय रोख रक्कम, वजनकाटा, दोन चारचाकी जप्त करण्यात आली. चौकशीत अमली पदार्थ राजस्थानमधून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुकेश विश्नोई, भरत विश्नोई आणि सुरेश या तिघांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, एपीआय विशाल पाटील त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news