Girish Mahajan | राजस्थानमध्ये धुळेकरांच्या वाहनाचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, गिरीश महाजन सरसावले

Girish Mahajan | खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन धुळे जिल्ह्यातील आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर वाहनाची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक झाली.
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभुपुरा गावाजवळ धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात नऊ जणांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने राजस्थानमधील कोटा येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्याचा आढावा घेतला.

Girish Mahajan
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन धुळे जिल्ह्यातील आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर वाहनाची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कोटा येथील जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता, जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत तसेच आवश्यकतेनुसार त्यांना अधिक चांगल्या आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

"अपघातातील जखमींना तातडीने आणि दर्जेदार उपचार मिळणे, तसेच मृतांच्या पार्थिवांना सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र शासन या दुःखदप्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे."

— गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री

Girish Mahajan
Nashik Kumbh Mela 2027 | नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याआधी मोठी मागणी! साधुग्राममधील कोट्यवधींची जागा आखाड्यांना हवी मोफत

याशिवाय मंत्री महाजन यांनी राजस्थानमधील पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम, जखमींची प्रकृती, सुरू असलेले उपचार आणि मदतकार्याची सद्यःस्थिती यांबाबत माहिती जाणून घेतली.

जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे पार्थिव लवकरात लवकर त्यांच्या मूळगावी आणण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व वाहतूक व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देशही मंत्री महाजन यांनी कोटा प्रशासनाला दिले. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.