Raj Thackeray in Nashik : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

Raj Thackeray : वणी गडावर सप्तश्रृंगी देवीचे घेतले दर्शन
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे स्वागत
नाशिक : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे स्वागत करताना नाशिक जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम. pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.५) दुपारी ३ वाजता नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या दोन दिवसीय दौऱ्याच्या प्रारंभी त्यांनी वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मनसेचे राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते.

नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यभर दौरा करीत आहेत. नुकतेच ते विदर्भ दौऱ्यावर होते. आता दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर असून, उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमधील ४७ विधानसभा मतदार संघाचा ते आढावा घेणार आहेत. शनिवारी (दि.५) नाशिकमध्ये दाखल होताच, त्यांचा ताफा ओझर विमानतळावरून थेट वणी गडावर पोहोचला. यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पूत्र अमित ठाकरे यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. रात्री ८ वाजता ते वणी येथून नाशिककडे निघाले. त्यानंतर चांडक सर्कल येथील हॉटेल एसएसके येथे ते मुक्कामी होते.

दरम्यान, रविवारी (दि.६) उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या त्या गाठीभेटी घेणार आहेत. (Mission Uttar Maharashtra) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हॉटेल एसएसके येथे उत्तर महाराष्ट्रातील विधानसभानिहाय आढावा बैठका घेणार असल्याने, उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (MNS President Raj Thackeray's Navnirman Yatra is going on in the state)

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे स्वागत
Nashik | राज ठाकरेंचे आजपासून ‘मिशन उत्तर महाराष्ट्र’

स्वत: केली ड्रायव्हींग

ओझर विमानतळावरून वणीला जात असताना राज यांनी मध्येच भररस्त्यात त्यांचा ताफा थांबविला. त्यानंतर त्यांनी स्वत: कारचे स्टेअरिंग हाती घेत ड्रायव्हींग करीत वणी गड गाठला. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा त्यांच्या कारमागे होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news