Rain News | दसऱ्यावर परतीच्या पावसाचे सावट, आणखी चार दिवस जोरधार

परतीच्या पावसाने पुन्हा झोडपले, यलो अलर्ट
Next 4 days of rain will lash the west coast
पुढील 4 दिवस पावसाचेFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - सगळीकडे नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह असताना पावसाने गोंधळ घातला आहे. नागरिकांमध्ये दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरु आहे. या सगळ्यावर आता पावसाचे सावट असणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नाशिक जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस आणि वादळामुळे शहराची अवस्था जलमय झाली आहे. बळीराजावर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने संकट येऊन ठेपले आहे.

Next 4 days of rain will lash the west coast
Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

उद्या शनिवारी (दि.12) शहरासह विविध ठिकाणी दसरा सणानिमित्त राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र त्यावर परतीच्या पावसाचे सावट असणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या राजकीय नवरात्रीची धूम पहायला मिळाली. मात्र हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुढील दोन ते चार दिवसामध्ये जोरधार बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news