नाशिक : मध्य रेल्वेने हरित ऊर्जा संसाधनातंर्गत पाच विभागांमध्ये २०५ ठिकाणी सौरपॅनल बसविले आहे. या सौरपॅनलच्या माध्यमातून मध्य रेल्वेने ८.०४ एमयू (दशलक्ष युनिट) ऊर्जा निर्माण केली आहे. हे प्रमाण ६ हजार ५९५ टन कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासारखे आहे. (Central Railway has installed solar panels at 205 locations in five divisions under green energy resource)
मध्य रेल्वेने आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी हरित आणि अक्षय ऊर्जा निवडण्यात नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यातंर्गत मध्य रेल्वेवर अक्षय ऊर्जेचा हिस्सा सध्या ट्रैक्शनकरीता 9.9 टक्के व नॉन-ट्रैक्शनकरीता 6.५ टक्के वापर हरित व नविकरणीय ऊर्जा संसाधनांचा उपयोग केला जात आहे. मध्य रेल्वेने जुलैअखेर ५ विभागांमध्ये २०५ ठिकाणी सौरपॅनेल बसवण्याचे काम पुर्ण केले. ज्यात मुंबई विभागातील ४७ ठिकाणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागपूर विभागात ५८, पुणे विभाग ५०, भुसावळ विभाग ३२ तसेच सोलापूर विभागातील १८ ठिकाणी सौरपॅनेल बसविले आहे. सौरपॅनलच्या माध्यमातून रेल्वेला पुरेशी ऊर्जा उपलब्ध झाल्याने महसुलातही मोठी बचत झाली.
मध्य रेल्वेने २०२३-२४ वर्षात पाचही विभागातील सौर पॅनेलच्या माध्यमातून ८.०४ एमयू (दशलक्ष युनिट) ऊर्जा निर्माण केली. हे प्रमाण ६ हजार ५९५ टन कार्बन फुटप्रिंट कमी झाला आहे. यामध्ये मुंबई विभागात ५.५६ एमयू वीजनिर्मिती (४५५७.१७ टन कार्बन फूट प्रिंटच्या बचतीच्या समतुल्य) करण्यात आली. भुसावळ विभागात १.३५ एमयू (कार्बन फूटप्रिंटच्या ११०८.७६ टन बचतीच्या समतुल्य), पुणे ०.९६ एमयू (७८४.४४ टन कार्बन फूट प्रिंट), नागपूर ०.०९ एमयू (७६.८० टन कार्बन फूट प्रिंटच्या बचतीच्या समतुल्य) आणि सोलापूर विभागात ०.०८ एमयू (६७.६१ टन कार्बन फूट प्रिंटच्या बचतीच्या समतुल्य) आहे.
मध्य रेल्वेला साैरपॅलनमधून मिळालेल्या ऊर्जेतून महसुलामध्येही बजत झाली आहे. ही रक्कम ४.६२ कोटी इतकी आहेे. २०३० पर्यंत भारतीय रेल्वेने मिशन कार्बन न्यूट्रल साध्य करण्यासाठी ऊद्देश आहे. त्यादृष्टीने अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा लाभ घेण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.