Railway News : मनमाड- इंदूर रेल्वे उत्तर महाराष्ट्रासाठी 'भाग्यरेषा'

प्रस्तावित मार्गामुळे कृषी, औद्योगिक विकासाला मिळणार चालना
Indina Railway
मनमाड- धुळे -इंदूर रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.file photo
Published on
Updated on

नाशिक : बहुचर्चित मनमाड- धुळे -इंदूर रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे कृषी, औद्याेगिक विकासाबरोबर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार आहे. (Manmad-Dhule-Indore Railway has been approved by the Central Government)

Summary

असा आहे रेल्वेमार्ग

  • ३०९ किलोमीटर अंतर

  • नव्या मार्गावर ३० स्थानके

  • मालेगाव रेल्वेच्या नकाशावर

  • सन २०८-२९ पर्यंत पूर्णत्वास येणार

  • मुंबई-इंदूर प्रवासासाठी नवा पर्याय

  • १०२ लाख मनुष्य दिवसांचा थेट रोजगार

  • हजार गावे, ३० लाख लोकसंख्येला फायदा

स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९०८ पासून मागणी असलेल्या मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. ३०९ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी शासनाने १८ हजार ३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीन मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक व धुळे तसेच मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, धार व इंदूर हे जिल्हे जोडले जातील. पण मुंबई ते इंदूर हे अंतर साधारणत: २०० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे दळणवळणला अधिक चालना मिळेल.

मनमाड-इंदूर नव्या रेल्वेलाइनमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व भाजीपाला हा जलदरीत्या उत्तर भारतात पाठविणे शक्य होईल. धुळ्यातील कृषिमाल तसेच मध्य प्रदेशातील भात व बाजरी पीक उत्पादकांना मोठा फायदा मिळणार आहे. मात्र, मध्य प्रदेशातील विविध आद्योगिक क्षेत्र हे थेट मुंबईतील जेनपीटीशी कनेक्ट होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवासी रेल्वेगाड्यांसह सीमेंट, लोह, ऑटोमोबाईल, पेट्रोलियम पदार्थांची जलद वाहतूक करणे शक्य होणार आहे. औद्योगिक विकासासाठी सदरचा मार्ग हा चालना देणारा ठरणार आहे.

दोन ज्योतिर्लिंग जोडले जाणार

नवीन रेल्वेमार्गामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच मध्य प्रदेशातील उज्जैनचे महाकालेश्वर हे दोन आद्य ज्योतिर्लिंग जोडले जाणार आहे. तसेच नाशिक, धुळे, उज्जैन व इंदूर या जिल्ह्यांमधील पर्यटनाला अधिक वाव असल्याने रोजगार निर्मितीला मदत मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news