

नाशिक : काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाला विरोध होत असल्याने शिंदे गटाकडे ते जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
दिवे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे. ते अद्याप कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप इच्छूक नसले तरी प्रभाग क्रमांक १६ मधून ते भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या महापालिका निवडणुक प्रभारी प्रा. देवयानी फरांदे यांनी दिवे अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. राहुल दिवे यांनी राजीनामा दिल्याचे सांगताना कार्यकर्त्यांशी बोलून पक्ष ठरवू असे सांगितले. भाजपने पक्षाच्या अटी व शर्तीवर प्रवेश दिला जाईल असे यापुर्वीचं स्पष्ट केल्याने दिवे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. दिवे यांचे बंधू प्रशांत यांनी यापुर्वीचं उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.