कर्तृत्वाचा 'आयकॉन'; सेवाभावी हातांना 'आरोग्यरत्न'चा मान

Pudhari Nashik Icon and Arogyaratna Awards-नाशिकच्या कर्तृत्वाला 'पुढारी'चा मानाचा मुजरा
नाशिक : दै. 'पुढारी' आयोजित 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न' पुरस्कार सोहळ्यात बोलताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर. व्यासपीठावर डावीकडून पुढारीचे युनिट हेड बाळासाहेब वाजे, निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, खा. राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, रिसिल डॉट इनचे संचालक सुधीर पठाडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे.

Published on
Updated on

नाशिक : कर्तृत्वाला सलाम, सेवाभावाला मानाचा मुजरा आणि नाशिकच्या लौकिकाला नवी झळाळी देणारा दिमाखदार सोहळा शुक्रवारी (दि. २१) हॉटेल ट्रीट येथील मनोहर गार्डन सभागृहात रंगला. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न' पुरस्कार सोहळ्याने सन्मान, संवेदना आणि अभिमानाचा अनोखा संगम घडवून आणला. आपल्या कर्तृत्वाने समाजात ठसा उमटविणाऱ्या आणि नाशिकची ओळख राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांना 'नाशिक आयकॉन' या प्रतिष्ठित पुरस्काराने तर आरोग्यसेवेत अतुलनीय योगदानाबद्दल शहरातील नामांकित डॉक्टरांच्या सेवेला 'आरोग्यरत्न' पुरस्काराने मानाचा मुजरा करण्यात आला.

नाशिक : दै. 'पुढारी' आयोजित 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न' पुरस्कार सोहळ्यात बोलताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर. व्यासपीठावर डावीकडून पुढारीचे युनिट हेड बाळासाहेब वाजे, निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, खा. राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, रिसिल डॉट इनचे संचालक सुधीर पठाडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे.
Nashik News | सरपंच-उपसरपंच ग्रामसभेला गैरहजर; संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थीचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी खा. राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, पुढारीचे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, युनिट हेड बाळासाहेब वाजे, रिसिल डॉट इनचे संचालक सुधीर पठाडे यांनीही उपस्थित राहून पुरस्कारार्थीच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे सरसावणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना होती. पारंपरिक फेटा परिधान करून सन्मान स्वीकारताना पुरस्कारार्थीच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव टिपण्यासाठी कुटुंबीयांचीही लगबग सुरू होती. मोबाइल कॅमेऱ्यांच्या क्लिकमध्ये कर्तृत्वाचे क्षण जणू कायमचे बंदिस्त होत होते. आपल्या माणसाच्या यशाचा अभिमान डोळ्यांत साठवत कुटुंबीयांनी अनुभवलेला हा आनंद सोहळा भावनिक किनार देणारा ठरला.

सभागृहात सन्मानाचा प्रत्येक क्षण टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमत होता. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव होत असताना नाशिकच्या सामाजिक, आरोग्य, राजकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचे प्रतिबिंब या सोहळ्यात उमटले. याचवेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर विशेष संवाद घडवून आणण्यात आला.

नाशिक : दै. 'पुढारी' आयोजित 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न' पुरस्कार सोहळ्यात बोलताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर. व्यासपीठावर डावीकडून पुढारीचे युनिट हेड बाळासाहेब वाजे, निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, खा. राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, रिसिल डॉट इनचे संचालक सुधीर पठाडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे.
Nashik civic funds pothole issue-चार वर्षांत महानगरपालिकेचे २६५ कोटी 'खड्ड्यांत', महासभेत 'बांधकाम'वर प्रश्नांचा भडिमार

जीवनाला नवा आयाम देणारा सोहळा

कर्तृत्वाचा गौरव आणि समाजाच्या भवितव्याचा वेध घेणारा हा सोहळा नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला नवा आयाम देणारा ठरला. 'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न'च्या माध्यमातून 'पुढारी' समूहाने केवळ पुरस्कार दिले नाहीत, तर नाशिकच्या मातीतील कर्तृत्वाला व्यासपीठ, सेवेला सन्मान आणि समाजाला प्रेरणेचा दीप दिल्याची भावना पुरस्कारार्थीकडून व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news