President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर अभिजित मुहूर्तावर सिंहस्थ महाकुंभाचा दिमाखदार शुभारंभ

President Droupadi Murmu | द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिजित मुहूर्तावर गोदातीरावर फडकवला कुंभध्वज
President Droupadi Murmu
President Droupadi Murmu
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरीचा पावन तीर... वैदिक मंत्रांचा मंगळघोष... शंखनादात दुमदुमलेला आसमान... भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेने भारावलेल हजारों भाविक! अशा भक्तिमय वातावरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवाी (दि. ३१) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी रामकुंडावर अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ पर्वाचा औपचारिक मंगारंभ झाला.

President Droupadi Murmu
Nashik Zilla Parishad | नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा; प्रशासकराज संपुष्टात येण्याची चिन्हे

बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महाप्रवाहाची नदी गोदामाईच्या साक्षिने झाली आणि अवघे नाशिक शहर भक्तिरोसात न्हाऊन निघाले. धर्मध्वजारोहणापूर्वी राष्ट्रपतींनी यज्ञकुंडांत समिधा अर्पण करून विश्वकल्याण, सुख-समृद्धी आणि सुयोग्य पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर जीवनादायिनी गोदावरीचे विधिबत पूजन करून ध्वजाला वंदन केले.

पुरोहितांच्या वेदमंत्रांच्या घोषात भगवी धर्मध्वजा आकाशत डौलाने फडकताच शंखनाद आणि जयघोषाने रामतीर्थाचा परिसर दुमदुमला. मंगळवाद्यांच्या निनादात मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. श्री गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने राष्ट्रपतींचा विशेष तापत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राजमंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

विविध आखाड्यांचे महंत, जगद्गुरु, धर्माचार्य आणि संत-महंतांच्या उपस्थितीत सोहळ्याला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. अखिल भारतीय आखाड्या परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. धार्मिक विधिविधे पुरोहितांचे सतीश शुक्ल आणि पुरोहितांचे सभासद अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केले.

धर्मध्वजावर अमृतकुंभ, ओंकार, 'श्री' अक्षर, बारा रेशमी गोंडे, घंटा आणि घुंगरू ही सुचिन्हे भारतीय आध्यात्मिक परंपरा, मर्यादा, सामाजिक एकता आणि ब्रह्मनादाचे प्रतीक आहेत. ध्वजाच्या दुसऱ्या बाजूस प्रतिष्ठा वाहन असलेली मगर तसेच सूर्य-चंद्र अंकित प्रतीक न राहता गोदावरीच्या महात्म्याचा आणि संतपरंपरेच्या चिरंतन वारसाचा संदेश देतात.

तीर्थराज कुशावर्तावर फडकली धर्मध्वजा

दक्षिणगंगा गोदावरीचे उगमस्थान आणि द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी आद्यास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरनगर्री शनिवाी अलौकिक व दैवी पर्वाचा प्रारंभ झाला. कोट्यवधी सनातनी भाविकांच्या अगाध श्रद्धेचे परम केंद्र असलेल्या पवित्र कुशावर्त तीर्थावर वेदोक्त मंत्रोच्चार, कर्णाकर्कश शंखध्वनी आणि अथांग भक्तीच्या वातावरणात सिंहस्थ कुंभमेळ्याचा 'धर्मध्वज' गणभ्रगरी घेतला.

President Droupadi Murmu
Simhastha kumbh mela nashik 2027| ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! गोदातीर, मंदिरे अन् होळकर पुलावर रोषणाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दक्षिणान्या श्येरी शारदापीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विद्धेश्वर भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हा मंगल सोहळा झाला.
शनिवारी (दि. ३१) सकाळपासूनच कुशावर्त परिसराला मंगलमय स्वरूप प्राप्त झाले होते. विविध आखाड्यांचे तपस्वी साधू-महंत, आचार्य, वैदिक पुरोहितांनी चांदीची मदिआळी,

आकर्षक पुष्पसज्जावट, आसमंतात डोलणाऱ्या पताका आणि धूप-दीपांच्या सुवासाने अवघा तीर्थपरिसर पावन झाला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहुण्यांना मंगलाय स्वरूपात स्वागत करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर : तीर्थराज कुशावर्तावर येथे ध्वजारोहणप्रसंगी पूजाविधी करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.