Nashik Politics | प्रवीण तिदमे यांचा 'यू-टर्न'; एकनाथ शिंदेंच्या फोननंतर राजीनामा मागे घेण्याची घोषणा

Nashik Politics | उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून थेट पक्षाच्या महानगरप्रमुख तसेच नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेणाऱ्या प्रवीण तिदमे यांनी अखेर यू टर्न घेतला आहे.
Pravin Timade
Pravin Timade
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून थेट पक्षाच्या महानगरप्रमुख तसेच नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेणाऱ्या प्रवीण तिदमे यांनी अखेर यू टर्न घेतला आहे.

Pravin Timade
Valentine Week 2026 | प्रेम, मैत्री अन् चॉकलेट्सचा गोड मिलाफ

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः माझ्याशी चर्चा करून गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांचे आदेश आणि जनभावना लक्षात घेता मी माझ्या महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सोमवारी (दि.९) तिदमे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आपली उमेदवारी डावलली गेल्याने समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी 'नॉट रिचेबल' झालो होतो.

माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी बंटीवर अन्याय होणार नाही, त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा निरोप कुटुंबीयांना दिला.

यानंतर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, आ. सुहास कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर, संपर्कप्रमुख राम रेपाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क केला.

Pravin Timade
Nashik Forest Department | सिन्नरच्या फुलेनगर शिवारात तरसाची पाच नवजात पिले आढळली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होतो, त्यामुळे उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठविण्यात आले नाही. तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस, असे स्पष्ट आदेश दिले, असे तिदमे म्हणाले.

पदांचे कालावधी बदलण्यावर विचार

पक्षप्रमुख शिंदे यांनी माझ्यासह सर्व नगरसेवकांना मंगळवारी (दि. १०) भेटण्यासाठी बोलाविले आहे. आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडणार आहोत. उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा आणि गटनेते पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला वापरून सर्वांना न्याय देण्याची मागणी आम्ही पक्षाकडे मांडणार असल्याचे तिदमे यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका हर्षदा गायकर, नगरसेवक भागवत आरोटे, सुवर्णा मटाले, डॉ. पूनम महाले, अस्मिता देशमाने, योगेश बेलदार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news