Nashik Civil Hospital | धक्कादायक! शासकीय रुग्णालयात बाळाची अदलाबदली

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, 
Nashik Civil Hospital
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - जिल्हा शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून चक्क बाळाची अदलाबदल झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. रविवार (दि.13) प्रसुतीकरीता एक महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात भरती झाली होती. त्यानंतर महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मुलगा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज प्रमाणपत्र देताना मुलगी देण्यात आली. त्यावरुन नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाले. त्यामुळे वरीष्ठ स्तरावरुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाला याबाबत जाब विचारला जात आहे.

Summary
  • नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

  • शासकीय रुग्णालयात बाळाची अदलाबदली झाल्याचा कुटुंबाचा आरोप

  • महिलेला मुलगा जन्माला आला म्हणून सांगण्यात आले होते

  • प्रहार संघटना आक्रमक, जिल्हा रुग्णालयात गोंधळ

  • डिस्चार्ज घेताना मुलगी हातात दिली असल्याचा नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालय महिलेने रविवारी (दि.13) रात्री बाळांतपणाला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेने मुलाला जन्म दिला असे डॉक्टरांनी सांगताच नातेवाईकांनी आनंद साजरा केला. तसेच, रुग्णालयाने रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलाच्या जन्माची नोंदही केली. त्यानंतर मात्र मंगळवारी (दि.15) रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.

परंतु, डिस्चार्ज प्रमाणपत्र देताना आणि रुग्णालयातून सुट्टी होताच महिलेच्या हाती मुलगी देण्यात आली. मुलाच्या जागी मुलगा देण्यात आल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. या प्रकरणाने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांनी बाळ घेण्यास नकार दिला असून त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. परंतू, कुटुंबीय ऐकायला तयार नसून यामध्ये प्रहार संघटनेने देखील उडी घेतलीअसून रुग्णालय प्रशासनावर आरोप करण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news