Nashik Municipal Corporation | स्वीकृतावरून सर्वच पक्षांत राडा!

Nashik Municipal Corporation | उबाठा-काँग्रेसमध्ये फूट; काँग्रेसला गळाला लावून भाजपचा सातव्या जागेवर डोळा
Nashik Municipal Election
Nashik MunicipalPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या दहा स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी (दि. ४) अंतिम मुदत असताना पक्षात राडा बघायाला मिळत आहे. काँग्रेसची मागणी झुगारून लावत उबाठाने मंगळवारी (दि. ३) दोन उमेदवारांचे अर्ज आयुक्तांना सादर केल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने बंडाचा झेंडा उगारला आहे.

Nashik Municipal Election
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

दुसरीकडे काँग्रेसला गळाला लावून सातवी जागा पादत पाडून घेण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केली आहे. तर कोट्यातून दोन जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवकपद एका वर्षासाठीच देण्याची भूमिका घेत येत्या चार वर्षांत स्वीकृत नगरसेवकपदावर आठ जणांना संधी देण्याची तयारी केली आहे.


गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्ती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपसह, शिंदेसेनेला दोन, तर उबाठा-काँग्रेसच्या संयुक्त गटाला दोन जागा मिळण्याचे समीकरण होते. मात्र, आता समीकरणेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडे ७२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सहा जागांसाठी १५ इच्छुकांचे नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून बुधवारी सकाळी नावे पक्षाच्या गटनेत्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांना प्रत्येकी एका नावाची शिफारस करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

उर्वरित तीन नावाबाबत पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनेतले पदाधिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. काही इच्छुकांना प्रत्येकी एक वर्ष संधी देण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीकडूनही गळ

अजित पवार गटाकडूनही नाराज काँग्रेस नगरसेवकांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे चार, मनसेचा एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ असूनही या पक्षांना सध्या स्वीकृतपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांवरून उबाठा-काँग्रेसमधील संघर्ष आणि भाजपची सातव्या जागेसाठी धडपड निर्णायक ठरणार आहे.

Nashik Municipal Election
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

शिंदे गटाचा निर्णय ठाण्यातून

  1. शिंदेगेटात दोन जागांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निष्ठावंतांना संधी मिळावी, यासाठी इच्छुकांच्या तातील वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही नावाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होणार असल्याचे समजते. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदावर एका वर्षासाठी संधी देण्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. आता पंचवार्षिकचे जवळजवळ पहिले वर्ष उलटले आहे. उर्वरित चार वर्षांत आठ जणांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उबाठा-काँग्रेस आघाडीत दुफळी

  1. उबाठाने काँग्रेसची स्वीकृत नगरसेवकपदाची मागणी फेोटाळून लावत आपल्या वाट्याच्या दोन जागांसाठी बाबा गायकवाड आणि हेमंतकुमार गायकवाड यांची नावे निश्चित केली आहेत. त्यांचे अर्ज मंगळवारी (दि. ३) आयुक्त मनिषा खत्री यांना सादर देखील केले आहेत. यामुळे काँग्रेस नाराज झाली असून आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस नगरसेवक सुफि जीन यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा असून, पाठीमागच्या बदल्यात स्वीकृत नगरसेवकपदाची एक जागा मिळावी, अशी मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतल्याची भी चर्चा आहे. या नाराजीचा फायदा घेऊन भाजप सातवी जागा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.

कायदेशीर अडचणींचे आव्हान

  1. दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांना स्वतंत्र भूमिका घेणे तांत्रिकदृष्ट्या सोपे नाही. उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे तीन अशा १८ नगरसेवकांची शहर विकास आघाडी स्थापन झाली असून, गटनेते केशव पोरजें यांच्याकडे आहे. या आघाडीतून स्वतंत्र गट निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या सदस्यांची साथ आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करणे अवघड ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.